लघुसद्धांतकौमुदी मधील स्वरसंधी
अच् संधि
दोन भिन्न शब्द एकत्र जोडण्याला संधि करणे असे म्हणतात. ( संधि म्हणजे जवळ जवळ आलेले दोन ध्वनी एकत्र करणे. ) दोन शब्दांची संधि करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकमेकांत मिसळून त्या दोहोंव्यतिरिक्त एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधि असे म्हणतात. असा या संधि मुळात ३ प्रकारच्या असतात. १. स्वर संधि - जेव्हा जोडल्या जाणारे दोन्ही वर्ण स्वर असतात, तेव्हा होणाऱ्या संधिस स्वर संधि असे म्हणतात. २. व्यंजन संधि - जेव्हा जोडल्या जाणारे दोन्ही वर्ण व्यंजने असतात किंवा किमान पहिला वर्ण व्यंजन असतो तेव्हा होणाऱ्या संधिस व्यंजन संधी असे म्हणतात. ३. विसर्ग संधि - जेव्हा जोडल्या जाणाऱ्या दोन शब्दांतील पहिल्या शब्दाच्या अंती विसर्ग असतो, तेव्हा होणाऱ्या संधिला विसर्ग संधि असे म्हणतात. तेथे निसर्गाचा विकार होतो.
स्वर संधि / अच् संधि -
जेव्हा जोडल्या जाणारे दोन्हीही वर्ण स्वर असतात, तेव्हा होणाऱ्या संधीला स्वर संधि असे म्हणतात. अशा स्वर संधि एकूण ५ प्रकारच्या असतात. १. दीर्घ संधि २. गुण संधि ३. वृद्धि संधि ४. यण संधि ५. अयादि संधि
१. दीर्घ संधि - जेव्हा दोन स्वरांच्या मिलनात नवीन दीर्घ स्वराचा विकार होतो, त्यास दीर्घ संधी असे म्हणतात.
सूत्र - अकः सवर्णे दीर्घः अर्थ - अक प्रत्ययातील वर्ण म्हणजे अ, इ, उ, ऋ आणि लृ या स्वरांच्या पुढे तेच स्वर आले असता दोहोंच्या जागी एकाच दीर्घ स्वराचा आदेश होतो. अ + अ = आ किंवा इ + इ = ई उदाहरण - श्री + ईशः = श्रीशः
२. गुण संधि - जेव्ह दोन स्वरन्च्या मीलनात दोन वर्णंचा गुण होतो, त्यास गुण संधि असे म्हणतात.
सूत्र १ - आद् गुणः अर्थ - अ वर्णाच्या पुढे कोणताही विजातीय वर्ण ( इ, ई, उ, ऊ ) आला असता संधिरूपात एकाच स्वर ( ए किंवा ओ ) आदेश होतो. त्यास गुण होणे असेही म्हणतात. अ + इ = ए किंवा अ + उ = ओ उदाहरण - गङ्गा + उदकम् = गङ्गोदकम् सूत्र २ - उरण रपरः अर्थ - जेव्हा अ, इ, उच्या समोर ऋ हा स्वर येतो तेव्हा अ, इ, उ हे स्वर र् ला पुढे घेऊन जातात आणि अर्, इर्, व उर् असे होतात. अ + ऋ = अर् उदाहरण - कृष्ण + ऋद्धिः = कृष्णर्द्धिः
३. वृद्धि संधि - जेव्हा दोन स्वरांच्या मिलनात वृद्धी झालेला स्वर आदेशित होतो, त्यास वृद्धी संधी असे म्हणतात.
सूत्र - वृद्धिंरेचि अर्थ - अ किंवा आच्या समोर ए किंवा ऐ आला तर ऐ आदेश होतो आणि अ, आच्या समोर ओ किंवा औ आला तर औ आदेश होतो. यास वृद्धी होणे असे म्हणतात. उदाहरण - कृष्ण + एकत्वम् = कृष्णैकत्वम्
४. यण संधि - इक् प्रत्यहरतिल स्वरासमोर कोणताही विजातीय स्वर आला तर यण प्रत्याहारातील वर्ण आदेशित होतो.
सूत्र - इको यणचि अर्थ - स्वर संधि करताना इ, उ, ऋ आणि लृ या स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास अनुक्रमे य्, व्, र् आणि ल् हे वर्ण आदेशित होतात. इ + उ = यु उदाहरण - सूत्रेषु + अद्रुष्टं = सूत्रेश्वद्रुष्टं
५. अयादि संधि - संधि करत असताना एच् प्रत्याहारातील स्वारासमोर कोणताही स्वर आला तर अयादि आदेश होतो.
सूत्र - एचोयवायावः अर्थ - ए, ओ, ऐ आणि औ या स्वारांसमोर कोणताही स्वर आल्यास अनुक्रमे अय्, अव्, आय् आणि आव् अस आदेश होतो. ओ + ए = अये उदाहरण - नै + अकः = नायकः
या ५ प्रकारच्या संधिंना स्वर संधि असे म्हणतात. यात महत्त्वाचे म्हणजे ज्या दोन वर्णांची संधि करायची आहे ते दोन्हीही स्वर असणे आवश्यक आहे. " अच् " प्रत्याहारातील वर्ण हे स्वर वर्ण आहेत. म्हणून या संधीस " अच् संधि " असेही म्हणतात.