Jump to content

लखनौ सुपर जायंट्स २०२२ संघ

लखनौ सुपर जायंट्स
२०२२ मोसम
प्रशिक्षकअँडी फ्लॉवर
कर्णधारलोकेश राहुल
मैदानभारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ

लखनौ सुपर जायंट्स हा लखनौ, उत्तर प्रदेश येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. हा संघ भारतीय प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार आहे. [][] संघाची मालकी RPSG समुहाकडे आहे ज्यांच्याकडे यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट फ्रँचायझी होती. संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे तर प्रशिक्षकपदाचा भार अँडी फ्लॉवर यांच्याकडे आहे.[]

आयपीएल २०२२ च्या १५ व्या आवृत्तीसाठी लखनौ फ्रँचायझी नव्याने स्थापन करण्यात आली. संजीव गोयंका यांच्या मालकीच्या RPSG ग्रुपने तब्बल ७,०९० कोटी रुपयांना फ्रँचायझी विकत घेतली.[] यापूर्वी, आयपीएल २०२१ पर्यंत आठ संघ एकमेकांसोबत खेळत होते. लखनऊ संघाने २४ जानेवारी २०२२ रोजी अधिकृत ट्विटर हँडलवर आयपीएल २०२२ साठी त्यांचे नाव "लखनौ सुपर जायंट्स" म्हणून घोषित केले.

पार्श्वभूमी

नवीन संघ म्हणून, फ्रँचायझीला २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंची निवड करण्याची मुभा होती.[][]

फ्रँचायझीने २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंची निवड केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील भारताचा स्टँड-इन कर्णधार लोकेश राहुल, हा लखनौ फ्रँचायझीसाठी पहिला अधिग्रहित केलेला खेळाडू होता आणि त्याला १७ कोटी रुपयांत कारारबद्ध करण्यात आले. मार्कस स्टोइनिसला ९.२ कोटी रुपयांमध्ये तर युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोई २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी ४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले गेले.

लखनौ संघासाठी तीन खेळाडूंशी करार केल्यानंतर, मेगा लिलाव २०२२ आधी त्यांच्याकडे रु. ५९.८ कोटी रक्कम उरली. लखनौ टीमला जास्तीत जास्त रु. ९० कोटी खर्च करण्याची परवानगी होती

याशिवाय एलएसजीने आयपीएल लिलाव २०२२ मध्ये आणखी १८ नवीन खेळाडूंशी करार केला. नवीन फ्रँचायझीने बंगळूरमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खेळाडूंना (५- भारतीय खेळाडू, ३- परदेशी खेळाडू) खरेदी केले आणि लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आणखी १३ खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये जोडले. फ्रँचायझीसाठी सर्वात महागडा खेळाडू म्हणजे गोलंदाज अवेश खान (आधारभूत किंमत २० लाख) हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू बनला, त्याला लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने ₹१० कोटींमध्ये खरेदी केले. अवेश खान नंतर[], दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला, ऑल राउंडर जेसन होल्डर (आधारभूत किंमत १.५ कोटी), ज्याला लिलावात रु. ८.७५ कोटींमध्ये खरेदी केले गेले .

ऑल राउंडर कृणाल पंड्याला (आधारभूत किंमत २ कोटी) रु. ८.२५ कोटीमध्ये करारबद्ध करण्यात आले. लखनौ फ्रँचायझीने एकूण २१ खेळाडू खरेदी केले आहेत ज्यात ७ अष्टपैलू, ७ गोलंदाज, १ यष्टीरक्षक आणि ३ फलंदाज आहेत. ज्यामध्ये १४ भारतीय आणि ७ परदेशी खेळाडू आहेत.

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २१ (१४ - भारतीय, ७ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
फलंदाज
लोकेश राहुलभारतचा ध्वज भारत१८ एप्रिल, १९९२ (1992-04-18) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२१७ कोटी (US$३.७७ दशलक्ष)कर्णधार
इव्हिन लुईसत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो२७ डिसेंबर, १९९१ (1991-12-27) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी
मनिष पांडेभारतचा ध्वज भारत१० सप्टेंबर, १९८९ (1989-09-10) (वय: ३४)उजव्या हाताने २०२२४.६० कोटी (US$१.०२ दशलक्ष)
मनन वोहराभारतचा ध्वज भारत१८ जुलै, १९९३ (1993-07-18) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
मार्कस स्टोइनिसऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१६ ऑगस्ट, १९८९ (1989-08-16) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२९.२ कोटी (US$२.०४ दशलक्ष)परदेशी
जेसन होल्डरबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस५ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-05) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२८.७५ कोटी (US$१.९४ दशलक्ष)परदेशी
कृणाल पंड्याभारतचा ध्वज भारत२४ मार्च, १९९१ (1991-03-24) (वय: ३३)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०२२८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष)
दीपक हूडाभारतचा ध्वज भारत१९ एप्रिल, १९९५ (1995-04-19) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२५.७५ कोटी (US$१.२८ दशलक्ष)
कृष्णप्पा गौथमभारतचा ध्वज भारत२० ऑक्टोबर, १९८८ (1988-10-20) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२90 लाख (US$१,९९,८००)
काईल मेयर्सबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस८ सप्टेंबर, १९९२ (1992-09-08) (वय: ३१)डावखुराउजव्या हाताने मध्यमगती२०२२50 लाख (US$१,११,०००)परदेशी
आयुष बडोनीभारतचा ध्वज भारत३ डिसेंबर, १९९९ (1999-12-03) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
करन शर्माभारतचा ध्वज भारत३१ ऑक्टोबर, १९९८ (1998-10-31) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
यष्टीरक्षक
क्विंटन डी कॉकदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१७ डिसेंबर, १९९२ (1992-12-17) (वय: ३१)डावखुरा-२०२२६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष)परदेशी
गोलंदाज
रवी बिश्नोईभारतचा ध्वज भारत५ सप्टेंबर, २००० (2000-09-05) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२४ कोटी (US$८,८८,०००)
शाहबाज नदीमभारतचा ध्वज भारत१२ ऑगस्ट, १९८९ (1989-08-12) (वय: ३५)उजव्या हातानेडावखुरा ऑर्थोडॉक्स२०२२50 लाख (US$१,११,०००)
मार्क वूडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड११ जानेवारी, १९९० (1990-01-11) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष)परदेशी
अवेश खानभारतचा ध्वज भारत१३ डिसेंबर, १९९६ (1996-12-13) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२१० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
अंकित राजपूतभारतचा ध्वज भारत४ डिसेंबर, १९९३ (1993-12-04) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम जलदगती२०२२50 लाख (US$१,११,०००)
मोहसीन खानभारतचा ध्वज भारत१५ जुलै, १९९८ (1998-07-15) (वय: २६)डावखुराडावखुरा मध्यम जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
मयांक यादवभारतचा ध्वज भारत१७ जून, २००२ (2002-06-17) (वय: २२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
दुश्मंत चमीराश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका११ जानेवारी, १९९२ (1992-01-11) (वय: ३२)उजव्या हातानेbउजव्या हाताने जलदगती२०२२२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालकसंजीव गोएंका
सीईओरघु अय्यर
प्रशिक्षकअँडी फ्लॉवर
मार्गदर्शकगौतम गंभीर
सहाय्यक प्रशिक्षकविजय दहिया
गोलंदाजी प्रशिक्षकअँडी बिकेल
स्रोत: https://www.facebook.com/LucknowSuperGiantsIPLT20/

किट उत्पादक आणि प्रायोजक

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

सामना ४
२८ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१५८/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१६१/५ (१९.४ षटके)
दीपक हूडा ५५ (४१)
मोहम्मद शमी ३/२५ (४ षटके)
राहुल तेवतिया ४०* (२४)
दुश्मंत चमीरा २/२२ (३ षटके)
गुजरात टायटन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.
  • लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी आयपीएल पदार्पण केले.

सामना ७
३१ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१०/७ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
२११/४ (१९.३ षटके)
रॉबिन उथप्पा ५० (२७)
रवी बिश्नोई २/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: वीरेंदर शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इव्हिन लुईस (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना १२
४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६९/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५७/९ (२० षटके)
लोकेश राहुल ६८ (५०)
टी. नटराजन २/२६ (४ षटके)
राहुल त्रिपाठी ४४ (३०)
अवेश खान ४/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना १५
७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१४९/३ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५५/४ (२० षटके)
पृथ्वी शॉ ६१ (३४)
रवी बिश्नोई २/२२ (४ षटके)
क्विंटन डी कॉक ८० (५२)
कुलदीप यादव २/३१ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: क्विंटन डी कॉक(लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना २०
१० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६५/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६२/८ (२० षटके)
शिमरॉन हेटमायर ५९* (३६)
कृष्णप्पा गौतम २/३० (४ षटके)
क्विंटन डी कॉक ३९ (३२)
युझवेंद्र चहल ४/४१ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना २६
१६ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९९/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८१/९ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६०)
जयदेव उनाडकट २/३२ (४ षटके)
सूर्यकुमार यादव ३७ (२७)
अवेश खान ३/३० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १८ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३१
१९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६३/८ (२० षटके)
फाफ डू प्लेसी ९६ (६४)
जेसन होल्डर २/२५ (४ षटके)
कृणाल पंड्या ४२ (२८)
जोश हेजलवूड ४/२५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३७
२४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३२/८ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६२)
कीरॉन पोलार्ड २/८ (२ षटके)
रोहित शर्मा ३९ (३१)
कृणाल पंड्या ३/१९ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ३६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि सय्यद खालिद (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४२
२९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१५३/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१३३/८ (२० षटके)
जॉनी बेअरस्टो ३२ (२८)
मोहसीन खान ३/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २० धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: कृणाल पंड्या (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४५
१ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९५/३ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१८९/७ (२० षटके)
लोकेश राहुल ७७ (५१‌)
शार्दुल ठाकूर ३/४० (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (३०)
मोहसीन खान ४/१६ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मोहसीन खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.

सामना ५३
७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१७६/७ (२० षटके)
वि
क्विंटन डी कॉक ५० (२९)
आंद्रे रसेल २/२२ (३ षटके)
आंद्रे रसेल ४५ (१९)
अवेश खान ३/१९ (३ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ७५ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५७
१० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१४४/४ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
८२ (१३.५ षटके)
शुभमन गिल ६३ (४९)
अवेश खान २/२६ (४ षटके)
दीपक हुडा २७ (२६)
रशीद खान ४/२४ (३.५ षटके)
गुजरात टायटन्स ६२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे गुजरात टायटन्स प्लेऑफ फेरीसाठी पात्र.[]

सामना ६३
१५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१७८/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५४/८ (२० षटके)
यशस्वी जयस्वाल ४१ (२९)
रवी बिश्नोई २/३१ (४ षटके)
दीपक हूडा ५९ (३९)
ट्रेंट बोल्ट २/१८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.

सामना ६६
१८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
२१०/० (२० षटके)
वि
श्रेयस अय्यर ५० (२९)
मोहसीन खान ३/२० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र तर कोलकाता नाइट रायडर्स स्पर्धेतून बाद.[१०]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल२०२२: ठरले! दोन नवीन आयपीएल संघांची घोषणा ह्या दिवशी होणार". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१. ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "आयपीएल २०२२: लखनौ सुपर जायंट्सच्या लोगोचे अनावरण". मिड-डे.कॉम (इंग्रजी भाषेत). ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल २०२२: लखनौ सुपर जायंट्स आणि अहमदाबाद संघ - कर्णधार, खेळाडू राखून ठेवलेले, शिल्लक रक्कम, कोचिंग स्टाफ, खेळाडूंची कामगिरी, तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेले सर्व तपशील". क्लिकमीस्पोर्ट्स. 2022-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "लखनौ सुपर जायंट्स २०२२ खेळाडू, नाव, मालक तपशील". टाइम ऑफ स्पोर्ट. 2022-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल २०२२: लखनौ सुपर जायंट्सने मेगा-लिलावापूर्वी संघाच्या लोगोचे अनावरण केले". इंडिया टुडे. १२ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "आयपीएल मेगा लिलाव २०२२ हायलाईट्स : सर्वात महागडे खेळाडू". क्लिकमीस्पोर्ट्स. १५ फेब्रुवारी २०२२. 2022-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "IPL 2022, LSG vs GT : लखनऊला ८२ धावांत गुंडाळून गुजरात टायटन्स ठरला प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ". लोकसत्ता. १० मे २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा". लोकसत्ता. १९ मे २०२२ रोजी पाहिले.