लक्सा
लक्सा (मराठी लेखनभेद: लाक्सा ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Laksa ; चिनी: 叻沙 ;) हे प्रामुख्याने मलेशिया, सिंगापूर व काही प्रमाणात इंडोनेशियात प्रचलित असलेले, चिनी व मलय खाद्यपद्धतींच्या संमिश्र प्रभावातून उद्भवलेल्या परानाकान खाद्यसंस्कॄतीतले शेवयांचे सूप आहे. लक्शाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात - करी लक्सा आणि आसम लक्सा. करी लक्शात नारळाच्या दूध घालून शिजवलेल्या मसालेदार करीत घातलेल्या शेवया असतात, तर आसम लक्शात माशांच्या आंबटसर चवीच्या सुपात घातलेल्या शेवया असतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- दि-लक्सा.कॉम (इंग्लिश मजकूर)