Jump to content

लक्ष्मण माने

लक्ष्मण माने
जन्म १ जून, १९४९ (1949-06-01) (वय: ७५)
फलटण
शिक्षण बी.ए.
धर्मबौद्ध धर्म
कार्यक्षेत्र लेखन, सामाजिक कार्य
भाषा मराठी
वडील बापू माने
पत्नी शशी माने
अपत्ये भाईशैलेंद्र (मुलगा) व समता (मुलगी)
पुरस्कार •  साहित्य अकादमी पुरस्कार,
 •  पद्मश्री

लक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराती, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे.[ संदर्भ हवा ]

माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.[ संदर्भ हवा ]

जीवन

लक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी सोमंथळी (फलटण, महाराष्ट्र) या एका लहान गावातील कैकाडी समाजात झाला. त्यांना भाईशैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. माने इ.स. २००६च्या ऑक्टोबरमध्ये नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे : लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. मुंबईत लक्ष्मण माने यांनी त्यांच्या ४२ पोटजातींच्या १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांसह २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.[][]

कारकीर्द

उपक्रम

१. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळा, करंजे, सातारा (१९८८) २. यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा, भोसरी, पुणे (१९८९) ३. साथी एस्. एम्. जोशी माध्यमिक आश्रमशाळा, उकळी, सातारा (२००४) ४. यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, भोसरी, पुणे (२००४) ५. राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक आश्रमशाळा,कोल्हापूर (१९९०) ६. राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा,कोल्हापूर (२००४) ७. शारदाबाई पवार प्राथमिक आश्रमशाळा,जकातवाडी, सातारा (१९९१) ८. शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा,जकातवाडी, सातारा (१९९४) ९. शारदाबाई पवार ज्युनिअर कॉलेज,जकातवाडी, सातारा (२००८) १०. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाळा, सोलापूर (१९९१) ११. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, जकातवाडी, सातारा []

अन्य सामाजिक कार्य

संस्थापक, एकता शिक्षण प्रसारक संस्था (१९७५ पासून) संस्थापक, भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान सचिव, महात्मा फुले समता प्रतिष्ठान संस्थापक, सामाजिक कृतज्ञता निधी अध्यक्ष, भटक्या-विमुक्त जमाती संघटना (१९९३ पासून) संस्थापक आणि अध्यक्ष, इंडियन् इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑफ नोमॅडिक ॲन्ड डि-नोटिफाइड ट्राईब्ज (१९८३) सेनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (१९८४ ते १९९४) अध्यक्ष, फुले - आंबेडकर साहित्य पंचायत (१९९० - १९९३) संस्थापक - संपादक आणि विश्वस्त, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने व प्रकाशन समिती (१९९०) सदस्य, संस्कृती साहित्य मंडळ, महाराष्ट्र (२०००) अविरोध सेनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०००) अध्यक्ष, लक्ष्मण माने एज्युकेशनल ट्रस्ट (२००३) []

मानसन्मान

  • संमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन (१९८७)
  • संमेलनाध्यक्ष : आदिवासी साहित्य संमेलन (१९८९)
  • संमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन (२००१)
  • संमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१०

आरोप व खंडन

सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील माने यांच्या संस्थेतील चतुर्थश्रेणी वर्गात काम करणाऱ्या सहा महिलांनी, माने यांनी अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात २०१३ साली दाखल केली होती. आश्रमशाळेतील स्वयंपाकी महिलेवर २००३ ते २०१० दरम्यान माने यांनी वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.[][][] या प्रकरणात १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देत माने यांना या आरोपांतून निर्दोष मुक्त केले.[]

पुस्तके

  • उद्ध्वस्त
  • उपरा (आत्मकथन)
  • क्रांतिपथ (कवितासंग्रह)
  • खेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)
  • पालावरचं जग (लेखसंग्रह)
  • प्रकाशपुत्र (नाटक)
  • बंद दरवाजा (लेखसंग्रह)
  • भटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)
  • विमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)

पुरस्कार

  • आंबेडकर व्याख्याता पुरस्कार (२००५)
  • न.चिं. केळकर पुरस्कार (१९८२)
  • बंडो गोपाल मुकादम पुरस्कार (१९८२)
  • पद्मश्री इ.स. २००८
  • फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृती (१९८१)
  • भारती विद्यापीठ पुरस्कार (१९८२)
  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)
  • लेखकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (१९९८)
  • समाजसेवकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरसकार (२००६)
  • यशवंतराव चव्हाण शिष्यवृत्ती (१९८८)
  • साहित्य अकादमी पुरस्कार (१९८१)
  • सर होमी भाभा फेलोशिप (१९८५

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-29 रोजी पाहिले.
  2. ^ https://www.thehindu.com/todays-paper/One-lakh-people-convert-to-Buddhism/article14769767.ece
  3. ^ माने, लक्ष्मण (१९८०). उपरा. मुंबई: ग्रंथाली. pp. १५६. ISBN 978-93-800092-05-8 Check |isbn= value: length (सहाय्य).
  4. ^ माने, लक्ष्मण (१९८०). उपरा. मुंबई: ग्रंथाली. pp. १५६. ISBN 978-93-80092-05-8.
  5. ^ "Noted Marathi author Laxman Mane booked for rape". Business Standard. 2013-03-26. 13 April 2013 रोजी पाहिले.
  6. ^ ""उपरा'कार मानेंची पद्मश्री परत घ्या". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-31 रोजी पाहिले.
  7. ^ आठवडय़ानंतरही लक्ष्मण माने बेपत्ता
  8. ^ "उपरा'कार लक्ष्मण माने निर्दोष". महाराष्ट्र टाइम्स. ९ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.