Jump to content

लंबवर्तुळाकार दीर्घिका

लंबवर्तुळाकार दीर्घिका ESO 325-G004

ज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार[श १] असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका (इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी) म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे या दीर्घिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना नसतात, त्यांचा आकार त्रिमितीय[श २] असतो आणि त्यांच्यातील तारे केंद्राभोवती काहीसे यादृच्छिक[श ३] कक्षेत असतात. या दीर्घिकांचा गट हा एडविन हबलने १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारलेल्या तीन मुख्य गटांपैकी एक गट आहे.[] हबलला लंबवर्तुळाकार दीर्घिका कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये विकसित होतात असे वाटले होते. कालांतराने ते चुकीचे आहे असा शोध लागला.[] लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील तारे सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांपेक्षा बरेच जुने असतात.[]

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ विवृत्ताभ किंवा विवृत्त (इंग्लिश: Ellipsoid - एलिप्सॉइड)
  2. ^ त्रिमितीय (इंग्लिश: Three dimensional - थ्री डायमेन्शनल)
  3. ^ यादृच्छिक (इंग्लिश: Random - रँडम)

संदर्भ

  1. ^ हबल, एडविन. द रेल्म ऑफ द नेब्यूला (इंग्रजी भाषेत). pp. १२४-१५१.
  2. ^ a b डी., जॉन. ॲस्ट्रॉनॉमी: द डेफिनिटिव्ह गाईड टू द युनिव्हर्स (इंग्रजी भाषेत). pp. २२४-२२५.