रोहित पवार
रोहित पवार | |
विधानसभा सदस्य | |
मागील | राम शिंदे |
---|---|
मतदारसंघ | कर्जत-जामखेड |
जन्म | २९ सप्टेंबर, १९८५ बारामती |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
आई | सुनंदा पवार |
वडील | राजेंद्र पवार |
पत्नी | कुंती पवार |
संकेतस्थळ | https://rohitpawar.org/ |
रोहित राजेंद्र पवार (२९ सप्टेंबर, १९८५:बारामती, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. [१] ते पवार परिवारातील सदस्य आहेत.
सुरुवातीचे जीवन आणि कुटुंब
रोहित पवार यांचा जन्म २९ सप्टेंबर, १९८५ रोजी बारामती, महाराष्ट्र येथे राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्या घरी झाला. ते अप्पासाहेब पवार आणि भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. [२] [३] बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. 2007 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून "बॅचलर ऑफ मॅनेजमेंट" मध्ये पदवी प्राप्त केली. [४] रोहित पवार यांचा विवाह कुंती पवार (मगर) यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत.
व्यावसायिक कारकीर्द
रोहित पवार बारामती ऍग्रो लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. [५] याशिवाय ते सप्टेंबर २०१८ पासून [६] २०१९ पर्यंत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष होते.
राजकीय कारकीर्द
रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. 2017 साली ते बारामती तालुक्यातील शिर्सुफळ - गुणवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली. [७] [८] [९] त्यांनतर ते पक्षात सक्रिय झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. [१०]
ऑक्टोबर 2019 मध्ये ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 135824 मतांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला.
रोहित पवार हे पवार घराण्यातील चौथ्या पिढीतील व्यक्ती आहेत, जे राजकीय पदावर आहेत.[१]
संदर्भ
- ^ a b "कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा 'राम' शिल्लक नाही; राेहित पवारांचा विजय | Election Result 2019 | eSakal". www.esakal.com. 2019-10-24 रोजी पाहिले.
- ^ "We need a mechanism to maintain sugar prices without quota system: Rohit Pawar". The Indian Express. 30 September 2018. 30 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "Sharad Pawar's grandnephew Rohit Pawar to contest Zilla Parishad elections, says he wants to do social work at grassroot level". Pune Mirror. India Times. 2019-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Rohit Pawar".
- ^ "Baramati Agro to push beet as a supplement to sugar from cane". Business Line. The Hindu. 11 December 2018 रोजी पाहिले.
- ^ "Indian sugar mills association".
- ^ "Rohit Rajendra Pawar (Winner)". MyNeta. 6 December 2017 रोजी पाहिले..
- ^ "Pawar-play for survival? Sharad's grand-nephew plunges into politics as NCP's fortunes slump". Hindustantimes. 7 February 2017. 7 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Sharad Pawar's grandnephew takes baby steps towards politics". Times of India. 8 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Decision 2019: Not in poll fray, Rohit Pawar campaigns for cousin Parth. Rohit Pawar us going to contest state assembly election from Karjat Jamkhed constituency in October 2019". The Indian Express. 26 March 2019. 26 March 2019 रोजी पाहिले.