रोहा-मुंढरी पूल (भंडारा)
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीवर निर्माणधीन मुंढरी ते रोहा या बहुप्रतीक्षित व महत्त्वांकाक्षी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावर्षी अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे व पावसाळ्यात बांधकाम काहीसे प्रभावित झाले होते. मात्र, ती उणीव भरून काढत युद्धस्तरावर यंत्रणा गतीने काम करीत आहे. त्यामुळे २०२३ च्या जानेवारीपर्यंत काम पूर्णत्वास जाईल, अशी शक्यता असून त्या दृष्टीने कामाचे नियोजन सुरू आहे. हा पूल महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक ३६१ वर बांधण्यात येत आहे.[१]
मोहाडी तालुक्यातील रोहा मुंढरी या दोन गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात असून जानेवारी २०२३ ला हा पूल रहदारीसाठी खुला होणार आहे. मोहाडी तालुक्यातील जांब येथून निघणारा मार्ग आंधळगाव, मोहाडी, कुशारी, रोहा, मुंढरी, खडकी, कोका, चंद्रपूर, रेंगेपार (कोठा), लाखनी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ५६ ला जुळणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वैनगंगा नदी वरील पुलाचे काम अपूर्ण आहे. पुलाचे २६ स्लॅब झाले असून ५ स्लॅब बाकी आहेत. या ५ स्लॅब नोव्हेंबर ते डिंसेबरपर्यंत पूर्ण होणार असून जानेवारीत वाहतूक सुरू होणार आहे.[१]
या पुलामुळे कांद्री, जांब, मोहाडी येथील परिसरातील लोकांना लाखनी, साकोली, तिरोडा जवळ पडणार असून वेळेची व अंतराची बचत होणार आहे. मोहाडी तालुका वैनगंगा नदी मुळे दोन भागात विभागला गेला आहे. पुलामुळे मोहाडी ते करडीचे अंतर फक्त १३ किमी पडणार आहे. या आधी हेच अंतर ( देव्हाडा माडगी) मार्गे ३० किमी पडत होते. करडी, मांडवी, खमारी मार्गे भंडारा ३२ कि.मी. आहे पण रोहा बेटाळा मार्गे आता भंडाराचे अंतर २५ किमी पडणार आहे. या पुलामुळे मोहाडी व करडी, तिरोडा, जांब, आंधळगाव या परिसराच्या बाजारपेठांना वाव मिळणार असून शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. करडी परिसरातील लोकांना माडगी, खापा मार्गे मोहाडी येथे जावे लागत होते. रोहा-मुंढरी पुलाने मोहाडी १३ किमी, तर तुमसरचे अंतर १७ किमी पडणार आहे. त्यामुळे दळणवळण सुलभ झाल्याने मोहाडी व करडीच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल.[१]
विकास
करडी, मुंढरी परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या सोयीकरीता वरदान ठरणार पुल खुला होऊन मोठी उपलब्धी मिळणार आहे. मोहाडी तालुक्यातील करडी व मुंढरी हा मोठा परिसर वैनगंगा नदीमुळे मोहाडीपासून जवळपास विभागला गेला होता. तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ, शिक्षण व इतर महसुली तसेच इतर कामकाजासाठी जाताना या भागातील नागरिकांना लांब अंतराचा फेरा मारून जावे लागत होते. यात जनतेचे श्रम, पैसा व वेळ यांचा अपव्यय व्हायचा. पुलामुळे दळणवळण व संपर्काच्या बाबतीत आतापर्यंत माधारलेल्या करडी परिसरासाठी विकासाचे नवे दालन खुले होणार आहे.
हे सुधा पहा
बाह्य दुवे
- https://www.berartimes.com/150079/ Archived 2022-12-26 at the Wayback Machine.
- https://www.lokmat.com/bhandara/proposal-bridge-worth-rs-56-crores-came-end/
संदर्भ
- ^ a b c "Karadi Bridge | SH-361 पर मुंढरी-रोहा पुल का काम युद्धस्तर पर जारी | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2022-12-26 रोजी पाहिले.