Jump to content

रोबोट शालू

रोबोट शालू

रोबोट शालू’ हा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए.आई. असलेला भारतीय बहुभाषिक यंत्रमानव आहे. ‘शालू’ हा केंद्रीय विद्यालय, मुंबई, येथे संगणक विज्ञान शिक्षक, दिनेश पटेल यांनी विकसित केला आहे.[][][] ‘शालू’ रोबोट ९ भारतीय भाषांमध्ये (हिंदी, मराठी, बंगाली,भोजपुरी इत्यादी ) आणि ३८ परदेशी भाषा (इंग्रजी, जपानी, जर्मन इत्यादी) मध्ये बोलू शकतो.[][][][][][] दिनेश पटेल यांनी सांगितले की हा रोबोट अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक व इतर साहित्याचा बनलेला आहे आणि खर्च कमी ठेवण्यासाठी कोणतीही उपकरणे अथवा थ्रीडी-प्रिंट केलेली नाहीत.[१०][११][१२] हा रोबो तयार करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला असून पन्नास हजार (५०,०००) रुपयांचा खर्च आला आहे.[][१३][१४] बऱ्याच रास्पबेरी पाई आणि आरडुइनो मायक्रोकंट्रोलरचा उपयोग रोबोटमध्ये मोजण्यासाठी केले गेले आहेत, आणि फिथन, टेन्सरफ्लो, नॅचरल लँग्वेज टूलकिट (एनएलटीके) इत्यादी मुक्त स्रोत फक्त सॉफ्टवेर प्रोग्रामिंगसाठी वापरले गेले आहेत.[][१२] तसेच रोबोटच्या पुढील आवृत्तीच्या विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.[१५]

इतिहास

रोबोटचे निर्माता श्री दिनेश पटेल यांचे म्हणणे आहे की, श्री एस. शंकर दिग्दर्शित भारतीय चित्रपट रोबोट (एंथिरान) आणि हॅन्सन रोबोटिक्समधील सोशल ह्युमेनोइड रोबोट सोफिया हे त्यांच्या प्रेरणेचा मुख्य स्रोत होते.[१२] हा रोबोट तयार करण्यास त्यांना 3 वर्षे लागली.[१२][१६] रोबोटची पहिली आवृत्ती २३ नोव्हेंबर २०२० रोजी डीडी न्यूझवर टेलिकास्टद्वारे जगासमोर आली.

वैशिष्ट्ये

विशेष उल्लेखनीय म्हणजे हा रोबोट ​​४७ भाषांमध्ये बोलण्यास सक्षम आहे.[][१६][१७][१८] रोबोट लोकांना ओळखू शकतो आणि लक्षातही ठेवू शकतो, वास्तविक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आणि सामान्य संभाषण करण्यास देखील सक्षम आहे.[] मानवांप्रमाणेच हा रोबोट वागतो, हात हलवतो, हास्य, आनंद आणि राग दाखवतो तसेच विनोद सांगून हसवतो सुद्धा.[] हा रोबोट एका स्क्रिप्टवर आधारित असल्याचा श्री दिनेश दावा करतात संवाद साधण्यास सक्षम असून, गणिताचे साधे प्रश्न ही सोडवू शकतो, सामान्य ज्ञान[१९] तसेच विज्ञान विषयांविषयी ज्ञान देतो, तोंडी प्रश्नमंजुषा आयोजित करतो. याव्यतिरिक्त, रोबोट हवामान माहिती.[][१२][२०] एखाद्या व्यक्तीची दैनिक पत्रिका, पाककृती, पुस्तक पुनरावलोकन,[२१] चित्रपट पुनरावलोकन आणि उत्पादनांचे वर्णन देखील अचूकपणे सांगू शकतो.[१२] तसेच हा रोबोट इतिहास आणि भूगोल संबंधित प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतो.[२२][२३]

उपयोग

रोबोट ‘शालू’ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी "रोबोट शिक्षक" म्हणून शाळांमध्ये उपयोजित केले जाऊ शकतात.[][२४] डीडी न्यूझच्या (दूरदर्शन) वृत्तानुसार, हा रोबोट ज्येष्ठ आणि लहान मुलांसाठी एक साथीदार म्हणून वापरला जाऊ शकतो. तसेच, हा रोबोट विविध कार्यालयांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून देखील वापरला जाऊ शकते, आणि  ऑफिसशी संबंधित प्रश्नांना केवळ तोंडीच नव्हे तर ईमेलद्वारे सुद्धा उत्तर देऊ शकतो.[]

संदर्भ

  1. ^ a b ट्रेंडिंग डेस्क (१३ मार्च २०२१). "Shalu Robot: शिक्षकानं तयार केला 'शालू' नावाचा रोबो; 47 भाषा बोलण्यात पटाईत, लोकांशीही साधणार संवाद". न्यूझ १८ लोकमत. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ सीमा महांगडे (२९ जानेवारी २०२१). "शालू हुमनोइड रोबोटचा ४७ भाषांमध्ये संवाद; सम्पूर्ण भारतीय बनावट". लोकमत. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ सामना आनलाइन (११ मार्च २०२१). "चर्चा तर होणार! जेव्हा 'शालू' 47 भाषांमध्ये बोलणार, प्रश्नांची धडाधड उत्तरही देणार". सामना. 2021-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "आई शपथ... 47 भाषा बोलणारा रोबो, मुंबईतील केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकाची कमाल". सामना. १४ मार्च २०२१. 2021-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "लयभारी! 9 भारतीय 38 विदेशी भाषा बोलणारी शालू". ज़ी न्यूझ़. १३ मार्च २०२१. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ a b c "केंद्रीय विद्यालय के टीचर ने बनाई रोबोट 'शालू', 47 भाषाओं में कर सकती है बात". न्यूझ़ 18. 29 Dec 2020.
  7. ^ a b "मुंबई के शिक्षक दिनेश पटेल ने "शालू" नाम का एक सामाजिक अर्ध-मानवीय रोबोट विकसित किया". दूरदर्शन. 5 Dec 2020.
  8. ^ "मुंबई : केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक दिनेश पटेल यांनी अर्धमानवी रोबोट विकसित केला आहे". सह्याद्री (वाहिनी). 12 Dec 2020.
  9. ^ a b c d e "First Social Humanoid Robot which can speak in 9 Indian and 38 Foreign languages". दूरदर्शन. 23 Nov 2020.
  10. ^ दर्शन पवार (१३ मार्च २०२१). "Mumbai Teacher Develops Humanoid Robot Shalu: कम्प्यूटर सायन्सच्या शिक्षकांनी विकसित केला 47 भाषा बोलणारा मानवी रोबोट; पहा Video". लेटेस्टली. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  11. ^ "Trending Video : 9 भारतीय और 38 विदेशी भाषा बोलने में सक्षम रोबोट 'शालू' तैयार". ज़ी हिन्दुस्तान. १५ मार्च २०२१. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  12. ^ a b c d e f Baiju, NT (9 Dec 2020). "Interview with Dinesh Patel, who built the humanoid 'Shalu'". Roboticsbiz.
  13. ^ विनोद सूर्यवंशी (१३ मार्च २०२१). "पाहिला 'रोबोट' चित्रपट आणि खराब सामान वापरून शिक्षकाने केली 'ही' करामत; वाचा, भन्नाट आणि रंजक गोष्ट". क्रुषिरंग. 2021-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  14. ^ "एक, दोन नव्हे तर तब्बल 47 भाषा बोलते 'शालू', व्यक्ती नसून 'रोबोट' आहे 'महाशय'". पोलिशनामा. १३ मार्च २०२१. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  15. ^ "मुंबई के टीचर की नई खोज:3 साल में बनाया 9 भारतीय और 38 विदेशी भाषाएं बोलने वाला रोबोट, इसका नाम है 'शालू'". दैनिक भास्कर. १७ मार्च २०२१. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  16. ^ a b "मुंबई के टीचर की नई खोज:3 साल में बनाया 9 भारतीय और 38 विदेशी भाषाएं बोलने वाला रोबोट, इसका नाम है 'शालू'". दैनिक भास्कर. 28 Dec 2020.
  17. ^ "Lakh Take Ki Bat : Farmers Protest gets Congress support, Rahul Gandhi submits letter to President". न्यूझ़ नेशन. 24 Dec 2020.
  18. ^ "'शालू' बोलेगी ४७ भाषाएं!…मुंबई आईआईटी ने बनाया रोबोट". सामना. 1 Jan 2020. 2021-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-14 रोजी पाहिले.
  19. ^ प्रजापति, शैतान (१४ मार्च २०२१). "Humanoid Robot Shalu : 47 भाषाओं में बात करती है 'शालू', सामान्य ज्ञान भी गजब का". राजस्थान पत्रिका. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  20. ^ जी मीडिया ब्‍यूरो (२१ फेब्रुवारी २०२१). "Sophia को टक्कर दे रही है भारत की Shaloo, यूपी के लाल ने बनाया भावनाओं को समझने वाला Humanoid Robot". ज़ी न्यूझ़. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  21. ^ "जौनपुर के एक शिक्षक का कमाल:फिल्म से प्रेरित होकर बनाया ह्यूमैनॉयड रोबोट 'शालू'; इसमें मानवीय संवेदनाओं के साथ 47 भाषाओं का ज्ञान". दैनिक भास्कर. २४ मार्च २०२१. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  22. ^ त्रिवेदी, अनुराग (5 Jan 2020). "केन्द्रीय विद्यालय के साइंस टीचर बनाया रोबोट 'शालू, 47 भाषाओं में कर सकता है बात". राजस्थान पत्रिका.
  23. ^ राफतुद्दी फरीद (१७ मार्च २०२१). "मामूली चीजों से बना डाला ह्यूमनाॅयड रोबोट 'शालू', 28 विदेशी भाषाओं में कर सकती है बात". राजस्थान पत्रिका. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  24. ^ "Sau Baat Ki Ek Baat | आज दिन भर की बड़ी ख़बरें | December 28, 2020 | Kishore Ajwani | News18 India". न्यूझ़ 18. 28 Dec 2020.