Jump to content

रॉबिन्सन क्रुसो (पुस्तक)

रॉबिन्सन क्रुसो

लेखकडॅनियेल डेफो
भाषाइंग्लिश
देशइंग्लंड
साहित्य प्रकारग्रंथ
प्रथमावृत्तीएप्रिल २५, १७१९
आय.एस.बी.एन.उपलब्ध नाही

रॉबिन्सन क्रुसो (इंग्लिश: Robinson Crusoe) हे डॅनियेल डेफोने लिहिलेले व इ.स. १७१९ साली प्रकाशित झालेले एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकात रॉबिन्सन क्रुसो नावाच्या काल्पनिक स्कॉटिश व्यक्तीचे आत्मचरित्र वर्णवले आहे. क्रुसो एका सागरीसफरेदरम्यान एका अज्ञात बेटावर अडकतो व पुढील २८ वर्षे त्या निर्मनुष्य बेटावर एकटा राहतो असे ह्या काल्पनिक कथेचे स्वरूप आहे.

समुद्रप्रवासाचे आत्यंतिक प्रेम असणारा क्रुसो ऑगस्ट १६५१ मध्ये पालकांचा विरोध असताना बोटीच्या प्रवासाला निघतो व अनेक संकटांनंतर ब्राझिलमध्ये स्थायिक होतो. ३० सप्टेंबर १६५९ रोजी क्रुसो आफ्रिकेला जाण्यासाठी निघतो परंतु त्याचे जहाज वादळात ओरिनोको नदीच्या मुखाजवळ एका अज्ञात व निर्मनुष्य बेटापाशी बुडते. जहाजातील क्रुसो व्यतिरिक्त सर्व प्रवासी बुडून मृत्यूमुखी पडतात. त्याच्या बेटावरील एकलकोंड्या आयुष्याची कथा ह्या ग्रंथात रंगवली आहे.

२५ एप्रिल १७१९ रोजी प्रकाशित झालेले हे पुस्तक प्रचंड गाजले. ह्याच्या अनेक आवृत्या निघाल्या व अनेक (मराठीसह) भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला गेला.

रॉबिन्सन क्रुसोवर आधारित अनेक पुस्तके, नाटके व चित्रपट काढले गेले.

बाह्य दुवे