Jump to content

रॉचेस्टर (न्यू यॉर्क)

रॉचेस्टर
Rochester
अमेरिकामधील शहर


रॉचेस्टर is located in न्यू यॉर्क
रॉचेस्टर
रॉचेस्टर
रॉचेस्टरचे न्यू यॉर्कमधील स्थान
रॉचेस्टर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
रॉचेस्टर
रॉचेस्टर
रॉचेस्टरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°9′56″N 77°36′41″W / 43.16556°N 77.61139°W / 43.16556; -77.61139

देशFlag of the United States अमेरिका
राज्य न्यू यॉर्क
स्थापना वर्ष इ.स. १८०३
क्षेत्रफळ ९६.१ चौ. किमी (३७.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५०५ फूट (१५४ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,१०,५६५
  - घनता २,३६८.३ /चौ. किमी (६,१३४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cityofrochester.gov


रॉचेस्टर (इंग्लिश: Rochester) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (न्यू यॉर्क शहर व बफेलोखालोखाल). न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात (अपस्टेट न्यू यॉर्क) ओन्टारियो सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इतकी लोकसंख्या असलेले रॉचेस्टर महानगर क्षेत्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अनेक अहवालांनुसार रॉचेस्टर हे निवासाकरिता, शिक्षणाकरिता व व्यापाराकरिता अमेरिकेतील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. येथील वैद्यकीय व तंत्रज्ञान शिक्षणासाठी व संशोधनासाठी रॉचेस्टर जगप्रसिद्ध आहे.

येथे जॉर्ज ईस्टमनने स्थापन केलेल्या ईस्टमन कोडॅक कंपनीचे मुख्यालय आहे.

जेनेसी नदी या शहरातून वाहत ऑन्टॅरियो सरोवरास मिळते.

शिक्षण

येथे रॉचेस्टर विद्यापीठ, रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या मोठ्या शिक्षणसंस्था आहेत.

वाहतूक

आय ९० हा पूर्व-पश्चिम महामार्ग रॉचेस्टरच्या दक्षिणेस पसार होतो. आय ३९० आणि आय ५९० हे महामार्ग तेथून शहराच्या मध्यवर्ती भागात येतात तर आय ४९० हा वर्तुळाकार महामार्ग शहराभोवती आहे. बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. रॉचेस्टर हे ॲमट्रॅक रेल्वे कंपनीच्या प्रवासी वाहतूकीचे महत्त्वाचे केंद्र आहे. ऑन्टॅरियो सरोवराला हडसन नदीशी जोडणारा ईरी कालवा रॉचेस्टरमधून जातो.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ