Jump to content

रॉक संगीत

रॉक संगीत (इंग्लिश: Rock music) हा इ.स. १९६० च्या दशकादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थानेब्रिटनमध्ये निर्माण झालेला संगीताचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील रॉक अँड रोल संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे [ संदर्भ हवा ].

विद्युत गिटार हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला बास गिटार व ड्रम ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.

भारतीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः कोलकाता, मुंबई व बेंगलुरू ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बॅंड कार्यरत आहेत. उषा उथुप ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच द रोलिंग स्टोन्स, बीटल्स इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बॅंडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "१०० सर्वोत्तम रॉक आल्बम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)