रैला ओडिंगा
रैला अमोलो ओडिंगा | |
[[चित्र:|रैला ओडिंगा]] | |
केन्याचे पंतप्रधान | |
कार्यकाळ १७ एप्रिल, इ.स. २००८ – ९ एप्रिल, इ.स. २०१३ | |
राष्ट्रपती | म्वाई किबाकी |
---|---|
जन्म | ७ जानेवारी, इ.स. १९४५ मासेनो, केन्या |
राष्ट्रीयत्व | केन्या |
पत्नी | आयडा ओडिंगा |
अपत्ये | फिडेल कास्ट्रो ओढिआंबो, रोझमेरी, धाकटा रैला, विनी |
निवास | नैरोबी, केन्या |
गुरुकुल | लीपझीग विद्यापीठ, माग्डेबर्ग विद्यापीठ |
व्यवसाय | यांत्रिक अभियांत्रिकी |
धर्म | ख्रिश्चन |
रैला अमोलो ओडिंगा (७ जानेवारी, इ.स. १९४५ - ) हा केन्याचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा पहिल्यांदा केन्याच्या संसदेत १९९२ च्या निवडणुकीत लंगाटाचा खासदार म्हणून निवडून गेला. हा २००१-२००२ दरम्यान केन्याचा उर्जामंत्री तर २००३-२००५ दरम्यान तेथील रस्ते, जाहीर बांधकाम आणि घरकुलमंत्री होता. २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा विरोधी पक्षांकडून उमेदवार होता. निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात दंगेधोपे व जाळपोळ झाल्यानंतर ओडिंगाने पंतप्रधान ग्रहण केले. याला अग्वांबो (गूढ माणूस), टिंगा, बाबा, राव आणि जाकोम या नावांनीही ओळखले जाते.