Jump to content

रेहेकुरी अभयारण्य

रेहेकुरी अभयारण्य
रेहेकुरी येथील काळवीट.
रेहेकुरी येथील काळवीट.
रेहेकुरी अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
रेहेकुरी अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
रेहेकुरी अभयारण्य
ठिकाणअहमदनगर, महाराष्ट्र, भारत
जवळचे शहरदौंड
गुणक18.604016°0′0″N 74.971412°0′0″E / 18.60402°N 74.97141°E / 18.60402; 74.97141
क्षेत्रफळ २.१७ चौरस किमी (०.८४ चौ. मैल)
नियामक मंडळमहाराष्ट्र वन विभाग
संकेतस्थळरेहेकुरी अभयारण्य



रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले अभयारण्य आहे. ते आकारमानाने अतिशय लहान (२.५ चौ.किमी) असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. खैर, हिवर, शिसवी, बाभळी, चंदन, बोर, करवंदे घायपात या येथील काही प्रमुख वनस्पती आहेत. अभयारण्याचा बहुतांशी भाग गवताळ येथील हरणांसाठी अन्नाचा प्रमुख स्रोत आहे. महाराष्ट्रतील काळवीट हा हरणाचा प्रकार त्याच्या नागमोडी आणि सुंदर शिंगांसाठी इतर हरणापेक्षा वेगळा उठून दिसतो. नर याच शिंगांद्वारे मादीला आकर्षित करून घेतो.

येथील प्राणी जीवनात वर नमूद केल्याप्रमाणे काळविटांची संख्या लक्षणीय आहे. अभयारण्य घोषित केले तेव्हा, म्हणजे १९८० साली १५ ते २० असलेली काळविटांची संख्या आता २०१७ साली ३००हून अधिक आहे.[]. काळविटांसोबत चिंकाराही येथे आढळून येतो. खोकड ,तरस, लांडग्याचेही अस्तित्व आहे. पक्ष्यांपैकी मोर व शिक्रा ,सर्पगरुड येथे आढळून येतात.

काळविटांची संख्या वाढल्याने व अभयारण्याचा आकार अतिशय लहान असल्याने साहजिकच अभयारण्याचा आकार काळविटांसाठी कमी पडत आहे. दरवर्षी काळविटांकडून आजूबाजूच्या शेतांमधील अन्नाची नासधूस करण्याचे प्रकार घडतात[].

कसे जावे

रेहेकुरी हे भेट देण्यासाठी अतिशय उत्तम अभयारण्य आहे. दौंडहून ६० किमी अंतरावर कर्जत (अहमदनगर जिल्हा) येथे यावे. दौंड किंवा अहमदनगरहून कर्जत येथे जाण्यासाठी राज्यपरिवाहन मंडळाच्या बसेस आहेत. कर्जतहून केवळ ४ - ५ किमीवर रेहेकुरी अभयारण्य आहे. वनविभागाचे विश्रामगृह असून तेथे रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच मोठ्या गटांसाठी तंबूचीही व्यवस्थ होऊ शकते. (जेवण खाण्याची व्यवस्था ग्रुपने स्वतः केल्यास उत्तम) काळवीट व चिंकारा येथे हमखास दिसतात. लहान मुलांना वन्यप्राण्यांचा अनुभव देण्यासाठी उत्तम जागा आहे. सिद्धटेक येथील गणपती व राशीन येथील देवीचे मंदिर येथील इतर आकर्षणे आहेत.

बाह्य दुवे

महाराष्ट्र शासन वनविभाग संकेत स्थळ Archived 2016-05-06 at the Wayback Machine.

संदर्भ

  1. ^ "JPAM Newsletter 16, April 1998". 2008-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-06-02 रोजी पाहिले.
  2. ^ Sakal news [मृत दुवा]