Jump to content

रेश्मा कुरेशी

रेश्मा कुरेशी
जन्म पूर्व मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा मॉडेल
कारकिर्दीचा काळ २०१६ पासून


रेश्मा कुरेशी ही एक भारतीय मॉडेल, व्लॉगर आणि ॲसिड हल्ल्याच्या विरोधी कार्यकर्त्या आहेत. भारतात त्या "मेक लव्ह नॉट स्कार्स" या मोहिमेचा चेहरा आहेत. स.न. २०१६ मध्ये न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी अर्चना कोचरसाठी कॅटवॉक करून अमेरिकेतील मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला.

प्रारंभिक जीवन आणि हल्ला

रेश्मा यांचा जन्म पूर्व मुंबईमध्ये झाला. त्या भारतातील एका टॅक्सी ड्रायव्हरच्या सर्वात लहान अपत्य (मुलगी) होत्या.[] त्या दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. तेथे त्यांच्या कुटुंबातील दहा सदस्य राहत होते.[] त्यांनी शाळेत कॉमर्सचे शिक्षण घेतले.[]

१९ मे २०१४ रोजी, वयाच्या सतराव्या वर्षी, रेश्मावर तिच्या मेव्हण्याने ॲसिड हल्ला केला होता. तिच्यावर गंधकयुक्त आम्ल फेकण्यात आले होते. हे दुष्कर्म करायला मेव्हण्याबरोबर दोन हल्लेखोर सुद्धा होते. या वेळेस ती अलाहाबाद शहरात आलिम परीक्षा देण्यासाठी प्रवास करत् होती. प्रत्यक्षात हा हल्ला तिची बहीण गुलशनवर होणार होता, पण चुकुन रेश्मावर झाला होता. या हल्ल्यानंतर इतर दोन हल्लेखोर कधीच पकडले गेले नाही, परंतु तिच्या मेहुण्याला अटक करण्यात आली होती.[]

हल्ल्यानंतर, थोड्या काळासाठी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. याला कारण त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातांवर झालेल्या जखमा होत्या. या हल्ल्यात त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता. ठीक झाल्यावर, रेश्मा "मेक लव्ह नॉट स्कार्स" या मोहिमेचा चेहरा बनल्या. या मोहिमेचा उद्देश "ज्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे त्यांच्यासाठी आवाज उठवणे" असा होता. आणि भारतातील ॲसिड विक्री बंद करण्याच्या मोहिमा करणे हाही होता.[] ॲसिडच्या विक्रीविरोधात मोहीम राबवण्याचा एक मार्ग म्हणून तिने ऑनलाइन ब्यूटी ट्यूटोरियल बनवण्यास सुरुवात केली.[] कॉस्मोपॉलिटन या नियतकालिकाने या व्हिडिओंना "हास्यास्पद सशक्तीकरण" असे म्हणून हिणवले होते.[]

सप्टेंबर २०१७ मध्ये "इंडिया न्यू इंग्लंड न्यूजला" दिलेल्या मुलाखतीत रेश्माला विचारण्यात आले की त्यांना हल्लेखोराकडून परत विचारणा करण्यात आली हिती का? त्या म्हणाल्या, "मी हल्लेखोर किंवा त्याच्या कुटुंबाशी परत कधीच बोलले नाही, पण मी त्याला दोन महिन्यांपूर्वी न्यायालयात भेटलो तेव्हा मनापासून मला त्याचा गळा फाडून काढायचा होता..." जेव्हा त्या हल्लेखोराने त्यांना पाहिले तेव्हा त्याने वकील आणि लोकांना सांगितले, "ती खूप मोठी मॉडेल बनली आहे. ती एका चांगल्या ठिकाणी आहे. त्यामुळे कृपया मला सोडून द्या किंवा मला मदत करा."[]

मॉडेलिंग

रेश्मा कुरेशी हा भारतातील मेक लव्ह नॉट स्कार्स या मोहिमेचा चेहरा आहे.[] न्यू यॉर्क टाइम्सने नोंदवले आहे की सप्टेंबर २०१५ पर्यंत तिच्या व्हिडिओंना ९,००,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.[]

स.न. २०१६ च्या न्यू यॉर्क फॅशन वीकसाठी, त्यांनी भारतीय डिझायनर अर्चना कोचरच्या फॅशन वीकमध्ये कॅटवॉक करून सुरुवात केली. यावेळेस त्यांनी "आश्चर्यकारक क्रीम आणि फ्लोरल फ्लोअर-लेन्थ गाउन" परिधान केला होता.[१०] रेश्मा कुरेशींचा मेकअप चीका चॅन आणि तिचे केस ऑब्रे लूट्सने केला होता.[] अनुभवाबद्दल रेश्मा कुरेशी म्हणाल्या, "हे चालणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते कारण माझ्यासारख्या बऱ्याच मुली ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या आहेत आणि यामुळे त्यांना धैर्य मिळेल. आणि ते लोकांना त्यांच्या दिसण्यावरून वागणाऱ्या लोकांना देखील दाखवून देता येईल की तुम्ही पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून निर्णय घेऊ नका - तुम्ही प्रत्येकाकडे समान दृष्टीने पाहिले पाहिजे. "[]

तसेच २०१६ न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी वैशाली कॉचरसाठी कॅटवॉक केले होते.[११]

सप्टेंबर २०१७ मध्ये, रेश्मा कुरेशी भारतातील म्हैसूर येथे आयोजित क्रॉक्स म्हैसूर फॅशन वीकमध्ये डिझायनर जहीनासाठी फिरल्या.[१२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Ashraf, Shara (9 Sep 2016). "11 things you didn't know about acid attack survivor Reshma Qureshi". Hindustan Times. 7 October 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Gill, Harsimran (10 Mar 2016). "Indian acid attack victims share their stories". Aljazeera. 7 October 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "No respite for India's acid victims despite promised compensation". The National. 13 Oct 2014. 7 October 2016 रोजी पाहिले.
  4. ^ a b Rogers, Katie (9 Sep 2015). "With Red Lipstick, Indian Acid Attack Victim Makes a Bold Statement". New York Times. 7 October 2016 रोजी पाहिले.
  5. ^ a b Buncombe, Andrew (8 Sep 2016). "Indian acid attack survivor walks the runway at New York Fashion Week". The Independent. 7 October 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Reshma Qureshi: Model, campaigner, acid attack survivor". BBC. 6 Sep 2016. 7 October 2016 रोजी पाहिले.
  7. ^ a b Mei, Gina (9 Sep 2016). "Acid Attack Survivor Reshma Qureshi Slays the New York Fashion Week Runway". Cosmopolitan. 7 October 2016 रोजी पाहिले.
  8. ^ Sud, Kishori (September 17, 2017). "Attacker wants me to 'let him go': Acid attack survivor Reshma Qureshi". India New England News. 2018-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2018 रोजी पाहिले.
  9. ^ Joshi, Sonam (9 Sep 2016). "Acid Attack Survivor Reshma Qureshi Steals The Show At New York Fashion Week". Huffington Post. 7 October 2016 रोजी पाहिले.
  10. ^ Lui, Kevin (9 Sep 2016). "Acid-Attack Survivor Reshma Qureshi Hits the Catwalk at New York Fashion Week". TIME. 7 October 2016 रोजी पाहिले.
  11. ^ Rodulfo, Kristina (10 Sep 2016). "See Striking Photos of Acid Attack Survivor Reshma Qureshi Walking at NYFW". Elle UK. 7 October 2016 रोजी पाहिले.
  12. ^ Sebastian, Shilpa (September 14, 2017). "The face of grit". The Hindu. 30 May 2018 रोजी पाहिले.