Jump to content

रेड बुल अरेना

रेड बुल अरेना
मागील नावे झेंट्रालस्टेडियोन (१९५६ - २०१०)
स्थानलाइपझिश, जाक्सन जर्मनी
उद्घाटन ४ ऑगस्ट १९५६
पुनर्बांधणी २००० – २००४
आसन क्षमता ४४,३४५

रेड बुल अरेना (जर्मन: Red Bull Arena) हे जर्मनी देशाच्या लाइपझिश शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. भूतपूर्व पूर्व जर्मनी देशामधील हे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम होते. इ.स. २०१० पर्यंत हे स्टेडियम झेंट्रालस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले.

२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
११ जून २००६सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो0–1Flag of the Netherlands नेदरलँड्सगट क37,216
१४ जून २००६स्पेनचा ध्वज स्पेन4–0युक्रेनचा ध्वज युक्रेनगट ग43,000
१८ जून २००६फ्रान्सचा ध्वज फ्रान्स1–1दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियागट ग43,000
२१ जून २००६इराणचा ध्वज इराण1–1अँगोलाचा ध्वज अँगोलागट ड38,000
२४ जून २००६आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना2–1 (AET)मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको१६ संघांची फेरी43,000


बाह्य दुवे