Jump to content

रेखा रमेश नार्वेकर

रेखा रमेश नार्वेकर (माहेरच्या राजलक्ष्मी नेवगीकर) एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. या सावंतवाडीचे कीर्तनकार तात्यासाहेब नेवगीबुवा यांच्या कन्या होत. त्यांचे आई आणि वडील दोघेही राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. तात्यासाहेबांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग होता. रेखा नार्वेकर कवडसे या दिवाळी अंकाच्या १९८१ ते १९८४ या काळात संपादिका होत्या.

कारकीर्द

लग्नानंतर रेखा नार्वेकर मुंबईत कुलाब्यात रहायला आल्या. तिथे त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम केले.

अन्य उपक्रम

प्रकाशित साहित्य

  • आनंदतरंग (ललित लेखसंग्रह)
  • दुर्गे दुर्गट भारी (कथासंग्रह)
  • नवे किरण (कथासंग्रह)
  • शब्द आणि मन (काव्यसंग्रह)

पुरस्कार

  • मराठी पत्रकार संघ पुरस्कार (१९८०-८१; १९८२)
  • मराठी वृत्तपत्र लेखक संघ पुरस्कार (१९८०-८१)
  • सावंतवाडी नगरपालिकेतर्फे ‘सावंतवाडीची आदर्श कन्या’ म्हणून सन्मान (इ.स. २००४)
  • स्नेह परिवार संस्थेचा ’कार्यगौरव’ पुरस्कार (इ.स. २००५)
  • आवास (अलिबाग) येथे कोमसापचे पहिले महिला साहित्य संमेलन आयोजित करून यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार (इ.स. २००६)
  • उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा प्रथम श्रेणीचा ’आशीर्वाद पुरस्कार’ (इ.स. २००८)
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथा पुरस्कार (इ.स. २०१०)
  • महिला विकास मंडळ कुलाबा (मुंबई) या संस्थेतर्फे १० वर्षे सातत्याने विश्वस्तपदाची जबाबदारी सांभाळल्याबद्दल सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव (इ.स. २०१२)