रॅपिड सिटी प्रादेशिक विमानतळ
रॅपिड सिटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: RAP, आप्रविको: KRAP, एफ.ए.ए. स्थळसूचक: RAP) हा अमेरिकेतील साउथ डकोटा राज्यातील रॅपिड सिटी शहरात असलेला विमानतळ आहे.[१] शहरापासून ९ मैल नैऋत्येस असलेला हा विमानतळ माउंट रशमोर पासून ३१ मैल अंतरावर आहे.
येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. स्कायवेस्ट एरलाइन्स, अलेजियंट एर आणि मेसा एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.
संदर्भ आणि नोंदी
- ^ RAP विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective November 4, 2021.