रुरकेला
रुरकेला ରାଉରକେଲା | |
भारतामधील शहर | |
रुरकेला | |
रुरकेला | |
देश | भारत |
राज्य | ओडिशा |
जिल्हा | सुंदरगढ जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७२१ फूट (२२० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,७२,७२१ |
- महानगर | ५,५२,२३९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
रुरकेला (हिंदीत रुड़केला, इंग्रजीत Rourkela) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या उत्तर भागात झारखंड राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस ३४० किलोमीटरवर, तर जमशेदपूरच्या नैर्ऋत्येस २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली रुरकेलाची लोकसंख्या सुमारे २.७२ लाख होती.
रुरकेला येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या नवरत्न सरकारी कंपनीचा मोठा कारखाना आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा ओरिसामधील कॅम्पस हा देखील रुरकेलामध्ये आहे.
वाहतूक
रुरकेला रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या हावडा-नागपूर-मुंबई ह्या प्रमुख मार्गावर दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग २३ रुरकेलामधून जातो.
हे सुद्धा पहा
- सुंदरगढ (लोकसभा मतदारसंघ)
बाह्य दुवे
- पर्यटन माहिती Archived 2015-09-24 at the Wayback Machine.