रुपाली गांगुली
रुपाली गांगुली | |
---|---|
रुपाली गांगुली (२०१३) | |
जन्म | ५ एप्रिल १९७७ कोलकाता, पश्चिम बंगाल |
नागरिकत्व | भारतीय |
कारकीर्दीचा काळ | १९८५- सद्य |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | मोनिषा साराभाई, अनुपमा |
पती | आश्विन वर्मा |
अपत्ये | १ |
रुपाली गांगुली ( ५ एप्रिल १९७७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने टीव्हीवरील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी असलेल्या रुपालीने तिच्या अभिनय कारकिर्दीला लहानपणीच सुरुवात केली. तिने वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या साहेब (1985) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. किशोरवयात तिने स्टारप्लसची मालिका संजीवनी (2002)मधील डॉ. सिमरन चोप्राच्या भूमिकेसह टीव्हीवर प्रवेश केला. या भूमिकेने तिच्या कारकिर्दीला यश मिळाले.
अतिशय लोकप्रिय सिटकॉम मालिका साराभाई वर्सेस साराभाई (2004) मधील मोनिषा साराभाईच्या भूमिकेमुळे रुपालीला खूप प्रसिद्धी मिळाली.[१][२] तिने अनेक यशस्वी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले. विशेषतः बा बहू और बेबी (2005), आणि परवरिश - कुछ खट्टी कुछ मीठी (2011) मधील भूमिकादेखील लोकप्रिय झाल्या.
त्यानंतर तिने अभिनयातून विश्रांती घेतली. सात वर्षांच्या विरामानंतर, गांगुली २०२० मध्ये स्टार प्लसची यशस्वी मालिका अनुपमासह परतली, ज्यात तिने प्रमुख भूमिका केली.[३]
संदर्भ
- ^ "Rupali Ganguly of Sarabhai vs Sarabhai: I am Monisha in real life. After marriage, I stopped bargaining with vegetable vendors". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-07. 2022-01-26 रोजी पाहिले.
- ^ "'Anupamaa' actor Rupali Ganguly reveals how she bagged Monisha's role in 'Sarabhai vs Sarabhai'". www.dnaindia.com. 2022-01-26 रोजी पाहिले.
- ^ "Anupamaa: Rupali Ganguly is set to surprise audience with her new makeover | TV - Times of India Videos". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.