Jump to content

रुक्मिणीदेवी अरुंडेल

Rukmini Devi Arundale (es); Rukmini Devi Arundale (hu); રુકમણી દેવી અરુંડેલ (gu); Rukmini Devi Arundale (ca); Rukmini Devi Arundale (de); Rukmini Devi Arundale (ga); Ռուքմինի Դևի (hy); 拉克米妮·達維·埃蘭德爾 (zh); Rukmini Devi Arundale (da); ルクミニー・デーヴィー・アルンデール (ja); Rukmini Devi Arundale (sv); רומקיני דווי ארונדלה (he); 拉克米妮·達維·埃蘭德爾 (zh-hant); रुक्मिणी देवी अरुंडेल (hi); రుక్మిణీదేవి అరండేల్ (te); ਰੁਕਮਣੀ ਦੇਵੀ ਅਰੁੰਡੇਲ (pa); ৰুক্মিণী দেৱী অৰুণ্ডেল (as); ருக்மிணி தேவி அருண்டேல் (ta); Rukmini Devi (it); রুক্মিণী দেবী অরুণ্ডেল (bn); Rukmini Devi Arundale (fr); Rukmini Devi Arundale (yo); ରୁକ୍ମଣୀ ଦେବୀ ଔଣ୍ଡଳେ (or); Rukmini Devi Arundale (nb); Rukmini Devi Arundale (sl); Rukmini Devi Arundale (pt); Rukmini Devi Arundale (pt-br); रुक्मिणी देवी अरुन्डेल (mai); رکمنی دیوی (ur); Rukmini Devi Arundale (pl); രുഗ്മിണി ദേവി അരുണ്ഡേൽ (ml); Rukmini Devi Arundale (nl); ᱨᱩᱠᱢᱤᱬᱤ ᱫᱮᱵᱤ ᱚᱨᱩᱱᱰᱮᱞ (sat); ರುಕ್ಮಿಣಿ ದೇವಿ ಅರುಂಡೇಲ್ (kn); رڪمڻي ديوي اروندويلي (sd); Rukmini Devi Arundale (sq); Rukmini Devi Arundale (en); روكمينى ديفى ارونديل (arz); Rukmini Devi Arundale (nn); रुक्मिणीदेवी अ‍ॅरंडेल (mr) danzatrice indiana (it); danseuse et personnalité politique indienne (fr); ભરતનાટ્યમ નર્તકી (gu); भरतनाट्यम नृत्यांगना (mr); indische Tänzerin, Politikerin und Theosophin (de); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); damhsóir agus cóiréagrafaí Indiach (1904–1986) (ga); سیاست‌مدار هندی (fa); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); راقصه من دومينيون الهند (arz); Indiaas politica (1904-1986) (nl); भरतनाट्यम नर्तकी (hi); ప్రముఖ నర్తకి (te); ਭਾਰਤੀ ਕਲਾਸੀਕਲ ਡਾਂਸਰ (pa); Indian dancer and choreographer (1904–1986) (en); ভাৰতীয় ভাৰতনাট্যম শিল্পী (as); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo) ருக்மிணிதேவி அருண்டேல் (ta); ルクミニー・デーヴィ・アルンデール (ja); Rukmini Devi (fr); રુકમણી દેવી (gu); Rukmini, Neelakanta Shastri (en); రుక్మణీ అరండేల్ (te); Rukmini Devi Arundale, രുഗ്മിണീദേവി അരുണ്ഡേൽ, രുക്മിണി അരുണ്ടേൽ (ml); Rukmini Devi (nl)
रुक्मिणीदेवी अ‍ॅरंडेल 
भरतनाट्यम नृत्यांगना
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी २९, इ.स. १९०४
मदुराई
मृत्यू तारीखफेब्रुवारी २४, इ.स. १९८६
चेन्नई
नागरिकत्व
व्यवसाय
पद
वैवाहिक जोडीदार
  • George Arundale
पुरस्कार
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रुक्मिणीदेवी अ‍रुंडेल भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका होत्या. दुराई येथे जन्म झाला होता. डॉ. जॉर्ज अ‍ॅरंडेल ह्या ब्रिटिश व्यक्तीशी त्यांनी १९२० मध्ये विवाह केला होता. त्यांनी १९२४ मध्ये पहिल्यांदाच परदेशगमन केले होते. रुक्मिणीदेवींना नृत्याची प्रेरणा आणि पाव्हलॉव्ह ह्या रशियन नर्तिकेकडून लाभली होती. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले होते. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्‌चे अध्ययन केले होते. भरतनाट्यम्‌च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता ह्यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये ह्यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले होते. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि,श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची स्थापना केली (१९३६) होती. थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. ‘बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल’च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली होती.

राज्यसभेच्या सभासद म्हणून १९५२ व १९५६ साली त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी ‘इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेस’ची १९५७त स्थापना केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहेत. ‘अ‍ॅरंडेल ट्रेनिंग सेंटर फॉर टीचर्स’, मद्रास, ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ अ‍ॅनिमल्स’, लंडन ह्या संस्थांच्या संचालिका, ‘अनिमल वेल्फेअर बोर्ड’च्या अध्यक्ष, ‘इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियन’, लंडन इत्यादींच्या उपाध्यक्षा आदी पदेही त्यांनी भूषविली आहेत. पद्मभूषण (१९५६), संगीत नाटक अकादमीचे नृत्यविषयक पारितोषिक (१९५७), अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानव्यविद्यांतील ‘डॉक्टरेट’ (१९६०), कलकत्त्याच्या रवींद्रभारती विद्यापीठाची डी. लिट. (१९७०) ह्यांखेरीज ‘प्राणिमित्र’ पारितोषिक, भरतनाट्यम्‌साठी राष्ट्रपती पारितोषिक आदी मानसन्मानही त्यांना लाभले होते.