रियो ब्लांको काउंटी, कॉलोराडो
रियो ब्लँको काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक एक काउंटी आहे. 2020च्या जनगणनेनुसार, लोकसंख्या 6,529 होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र मीकर येथे आहे . [२] या काउंटीला येथून वाहणाऱ्या व्हाईट नदीचे नाव देण्या आले आहे.
रियो ब्लांको कांउटीची रचना २५ मार्च, १८८९ रोजी गारफील्ड काउंटीमधून करण्यात आली.[३]
येथे १७ मे, १९७४ रोजी ऑपरेशन प्लाउशेर या प्रकल्पातहत या काउंटीमध्ये आण्विक स्फोट करण्यात आला होता. हा स्फोट खनिज तेलाचे उत्खनन सोपे व्हावे यासाठी करण्यात आला होता. गारफील्ड काउंटी असा स्फोट झालेली दुसरी काउंटी आहे.
चतुःसीमा
- मोफॅट काउंटी - उत्तर
- राउट काउंटी - ईशान्य
- गारफिल्ड काउंटी - दक्षिण
- युइंटा काउंटी, युटा - पश्चिम
मुख्य रस्ते
- राज्य महामार्ग १३
- राज्य महामार्ग 64
- राज्य महामार्ग 139
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Rio Blanco County, Colorado Genealogy Guide". Random Acts of Genealogical Kindness. 5 July 2016. 27 February 2021 रोजी पाहिले.