Jump to content

रितेश अग्रवाल

Ritesh Agarwal (es); রিতেশ আগরওয়াল (bn); Ritesh Agarwal (ast); रितेश अग्रवाल (mr); Ritesh Agarwal (de); ରିତେଶ ଅଗ୍ରୱାଲ (or); Ritesh Agarwal (sq); 利特施·阿加瓦尔 (zh); Ritesh Agarwal (id); Ritesh Agarwal (nl); 利特施·阿加瓦爾 (zh-hant); रितेश अग्रवाल (hi); ರಿತೇಶ್ ಅಗರ್ವಾಲ್, (ಓಯೋ ರೂಮ್ಸ್ ಸ್ಥಾಪಕ) (kn); Ritesh Agarwal (vi); ৰিতেশ আগৰৱাল (as); ريتيش أغاروال (ar); 利特施·阿加瓦尔 (zh-hans); Ritesh Agarwal (en) Empresario indio (es); ভারতীয় উদ্যোক্তা (bn); भारतीय उद्योगपती (mr); Indischer Unternehmer (de); ଓଡ଼ିଆ ଶିଳ୍ପଦ୍ୟୋଗୀ (or); fiontraí Indiach (ga); 印度企业家 (zh); Pengusaha India (id); ভাৰতীয় উদ্যোগী (as); Indiase ondernemer (nl); 印度企業家 (zh-hant); भारतीय उद्यमी (hi); ಭಾರತೀಯ ವಾಣಿಜ್ಯೋದ್ಯಮಿ (kn); Doanh nhân Ấn Độ (vi); Indian entrepreneur (en); رجل أعمال ومليردير هندي (ar); 印度企业家 (zh-hans); sipërmarrës indian (sq)
रितेश अग्रवाल 
भारतीय उद्योगपती
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९९३
कटक
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०१२
नागरिकत्व
व्यवसाय
  • व्यावसायीक व्यक्ती
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रितेश अग्रवाल हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत.[] ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. २०१३ मध्ये वयाचा २० व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.[][]

सुरुवातीचे जीवन

रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला. तेथेच प्राथमिक शिक्षणा घेतल्यावर ते अधिक शिक्षणासाठी राजस्थान मधील कोटा येथे गेले. रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता. त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत, किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती. तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवले की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील.

ओयो रूम्सची सुरुवात

२०१२ मध्ये त्यांनी आपल्या ओरॅव्हल स्टेज़ (Oravel Stays) नावाच्या कंपनीची सुरुवात केली. काहीच महिन्याने नवीन चालू झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना ३० लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांचा कंपनीला जे यश मिळाले त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा ह्या कंपनीचे मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरॅव्हल स्टेज़ कंपनी तात्पुरती बंद केली.[][]

नव्याने सुरुवात

रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद केली तरी त्यांनी हार मानली नव्हती, त्यांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावर त्यांनी विचार केला. २०१३ साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तीचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूम्सचा अर्थ असा होतो कि, तुमची स्वतःची रूम. ओयो रूम्सचा उद्धेश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेल्स मध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंद पडले तरच ते ओयो शी जोडले जात असे.

आता १५००० पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. २०१६ मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांचा कंपनी मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मधेच एका प्रतिष्ठित मॅगाझीन ने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली युवकांचा यादीमध्ये पहिल्या ५० लोकांचा यादी मध्ये स्थान दिले होते.

संदर्भ

  1. ^ "One billionaire every 10 days: India's 2020 count – Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ "OYO's Ritesh Agarwal and Future Group's Kishore Biyani did not make the cut this year to be among India's richest billionaires". Business Insider. 2021-03-03 रोजी पाहिले.
  3. ^ "OYO founder Ritesh Agarwal booked on charges of 'fraud, criminal conspiracy'". Times Now News (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  4. ^ "OYO Hotels & Homes announces leadership team reshuffle". Short Term Rentals (इंग्रजी भाषेत). 2021-02-02. 2021-03-03 रोजी पाहिले.
  5. ^ "OYO has $1 billion to fund operations until IPO: CEO Ritesh Agarwal". www.businesstoday.in. 2021-03-03 रोजी पाहिले.