Jump to content

रिडा अँड द म्युझिकल फोक्स

रिडा अँड द म्युझिकल फोक्स
सक्रिय वर्ष २०१०–चालू


'रिडा अँड द म्युझिकल फोक्स' हा भारतातील मेघालय येथील लोक धातूचा बँड आहे या बँडची स्थापना २०१० मध्ये झाली.[] हा बँड लोकसंगीत आणि खासी संगीतासाठी ओळखला जातो.[]

इतिहास

रिडा गॅटफोह या उद्योजिका , डिझायनर , गायिका आणि गीतकार सुद्धा आहेत. सध्या त्या शिलाँग आधारित सामाजिक उपक्रम "डाक टी क्राफ्ट" आणि "रिडा अँड द म्युझिकल फोक्स" या कला समूहाच्या संस्थापक आहे. रिडा ने या बँडची सुरुवात २०१० मध्ये केली.[]

बँड सदस्य

मेघालयातील गायक आणि डिझायनर रिडा गॅटफोह यांच्या सह संगीतकार आणि वाद्य निर्मात्यांच्या सहा सदस्यीय लोकांचा ग्रुप आहे. ग्रुपमध्ये पीटर मारबानियांग एनआयडी पदवीधर,[] शॉन नॉन्घुलू मोरेहेड हे शिलाँगमध्ये राहणारे स्वतः शिकलेले ड्रमर, वादक आणि संगीतकार आहे आणि प्रायोगिक ध्वनी डिझाइनसह कार्य करतो.[] त्यानंतर अमरनाथ हजारिका हे संगीतकार आणि गिटार वादक आहेत ज्यांचे संगीत कंटेम्पररी जॅझ ते अर्बन सोल पर्यंतच्या आवाजांचे एक सुंदर मिश्रण आहे.[] रायझिंगबोर कुर्कलांग हा दुतारा, मॅरींगॉड, सितार आणि इतर पारंपारिक वाद्ये बनवत आणि वाजवत आहे. बेनेडिक्ट स्केमलांग ह्यन्निव्हटा हा चित्रकार आणि बासरीवादक यांचा समावेश आहे.

अल्बम

बँडचा पहिला अल्बम 'म्युझिकल नेचर' याच्यामध्ये नऊ गाण्याचा समावेश आहे. हा मेघालयातील लोक संगीतकार आणि समकालीन कलाकार यांच्या सहकार्याने सीडीच्या माध्यमातून १९ मार्च २०१६ रोजी त्यांनी प्रदर्शित केला.[][]

पुरस्कार

  • स्पॅरो पुरस्कार २०१६[]

संदर्भ

  1. ^ "Folksy charm". The Hindu (इंग्रजी भाषेत). 15 October 2014. 23 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "How This Band from Meghalaya Reconnects with Nature". news18.com (इंग्रजी भाषेत). 5 June 2018. 23 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 February 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Art that talks green". The Shillong Times (इंग्रजी भाषेत). 19 February 2023. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Soul connect". The Hindu (इंग्रजी भाषेत). 13 October 2017. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Mumbai event to showcase music, food, arts and crafts from Meghalaya". Mid-day (इंग्रजी भाषेत). 27 June 2016. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "In conversation with Jazz musician from Northeast -Amarnath Hazarika". The North East Today (इंग्रजी भाषेत). 19 July 2016. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Harmony from the hill state". The Hindu (इंग्रजी भाषेत). 19 March 2016. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "The sounds of Meghalaya". The Hindu (इंग्रजी भाषेत). 21 March 2016. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Meet Rida and the Musical Folks from Shillong, winners of the 'Sparrow Award 2016'". The North East Today (इंग्रजी भाषेत). 13 January 2017. 25 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2023 रोजी पाहिले.