रिचर्ड बर्टन
कॅप्टन सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन (मार्च १९ १८२१- ऑक्टोबर २० १८९०) हे १९ व्या शतकातील एक प्रसिद्ध ब्रिटिश व्यक्ती आहेत. कॅप्टन सर बर्टन हे भारतात मुख्यत्वे वात्सायनाचे कामसूत्र या प्राचीन भारतीय ग्रंथाचे इंग्रजी भांषातर करणारे व या ग्रंथातील ज्ञान सर्व सामान्यांपर्यंत तसेच जगात पोहोचवणारे म्हणून परिचित आहेत. परंतु ब्रिटन मध्ये केवळ भाषांतरकार म्हणून नव्हे तर लष्करातील अधिकारी, लेखक, शोधक, भूगोलतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, कवी, उत्कृष्ट वक्ता, तलवारबाज तसेच राजकीय दुत असे विविधरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची काम्गिरी म्हणजे अशिया व अफ्रिकेतील नाईल नदीचे उगम स्थान शोधून काढणार्%या मोहिमेचे त्यांनी केलेले नेतृत्व. बर्टन यांना अनेक भारतीय, अरबी व युरोपीय मिळून २९ भाषा अवगत होत्या.
अफ्रिकेतील साहसाबरोबरच बर्टन यांनी मक्केमध्ये वेश बदलून अरबी संस्कृतीचा अभ्यास केला या दरम्यान त्यानी प्रसिद्ध अरबी परिकथा ज्या आज अरेबियन नाईट्स म्हणून ओळखल्या जातात, त्यांचे इंग्रजी भाषांतर केले. भारतात त्यांची ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कॅप्टन म्हणून त्यांची रवानगी झाली होती. याच काळात त्यांनी कामसूत्र सारख्या ग्रंथाचा अभ्यास केला. त्यांनी लंडन येथे कामशास्त्र सोसायटीची स्थापना केली. १८६० च्या दरम्यान त्यांची रवानगी अफ्रिकेत झाली व त्यानंतर त्यांनी रॉयल जिओग्राफिकल सोसायटीच्या सहकार्याने नाईल नदीच्या उगमाच्या शोधमोहिमेचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनचे दूत म्हणून अनेक देशात कामगिरी बजावली. त्यांच्या आयुष्यभराच्या कामगीरीवर १८८६ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला.
चित्रपटात
माउंटन्स ऑफ द मून - रिचर्ड बर्टन व जॉन हेमिंग स्पिक यांच्या नाईल मोहिमेवर आधारित हा चित्रपट आहे. बर्टन व स्पिक यांच्या मोहिमेचे मुद्देसूद सुरेख चित्रण तसेच मोहिमेनंतर दोघांमध्ये निर्माण झालेला तणाव या चित्रपटात आहे.