रिचर्ड फाइनमन
रिचर्ड फाइनमन | |
पूर्ण नाव | रिचर्ड फिलिप्स फाइनमन |
जन्म | मे ११, १९१८ क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका |
मृत्यू | फेब्रुवारी १५, १९८८ लॉस एंजिलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका |
निवासस्थान | अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
धर्म | नास्तिक |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
कार्यसंस्था | मॅनहटन प्रकल्प, कॉर्नेल विद्यापीठ, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी |
प्रशिक्षण | मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रिन्स्टन विद्यापीठ |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | जॉन आर्चिबाल्ड व्हिलर |
डॉक्टरेटकरता विद्यार्थी | अल्बर्ट हिब्ज, जॉर्ज त्स्वाइग |
ख्याती | क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स, पार्टिकल थिअरी, फाइनमन डायग्रॅम्स |
पुरस्कार | नोबेल पारितोषिक (१९६५) |
रिचर्ड फिलिप्स फाइनमन (मे ११, इ.स. १९१८ - फेब्रुवारी १५, इ.स. १९८८)एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररूपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या १३० भौतिकशास्त्रज्ञात १९९१ साली केलेल्या सर्वेक्षणात दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला.
जीवन
शैक्षणिक कारकीर्द
१९४२ मध्ये पीएचडी केल्यानंतर ते विस्कोंसिन विद्यापीठ,मेडिसन येथे रुजू झाले. मॅनहॅटन प्रकल्पाशी संलग्न झाल्यावर त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकपद सोडले.१९४५ मध्ये त्यांना विस्कोंसिन विद्यापीठातून डीनमार्क इनग्राम यांनी पत्र पाठवून पुन्हा विद्यापीठात शिकवण्याची विनंती केली.फाइनमन यांनी परत येण्याचा वायदा न केल्यामुळे त्यांची नियुक्ती वाढवण्यात आली नाही.त्यानंतर विद्यापीठात आल्यावर ते म्हणाले की "ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे."
युद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषतः त्यांनी ॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या अणूबॉंब हल्ल्याच्या मनस्तापातून भौतिकीतल्या क्लिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित केले.हे त्यांनी कोणत्याही गरजेतून नव्हे तर स्वयंसंतुष्टीसाठी केले.त्यातल्या काही समस्या जशी ट्वर्लिंगची भौतिकी,नटेटिंग डिशची हवेतली गतीचे विश्लेषण हे होत.या अभ्यासादरम्यान त्यांनी वर्तुळाकार गतीसाठी विविध समीकरणांचा वापर केला ज्यांनी त्यांना नोबेल पारितोषिकाच्या उंबरठ्यावर नेले.परंतु त्यांच्या आतली उत्कंठा अजून देखील संपली नव्हती.अनेक विद्यापीठांकडून आलेली प्राध्यापकपदाची मागणी इतकी होती की ते आश्चर्यचकित होत.त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज यासाठी सोडले की तेथे शिक्षक म्हणून त्यांना करण्यासाठी काहीही नव्हते. फाइनमन यांच्या मते "विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त" त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले. फाइनमन यांना उत्कृष्ट स्पष्टीकर्ता म्हणून संबोधले गेले.त्यांनी दिलेले प्रत्येक स्पष्टीकरण इतके प्रभावी होते की त्यामुळे त्यांना फार मान मिळाला.त्यांचा शिकवण्याचा मूलमंत्रच हा होता की "जर नवख्या व्याख्यानातच एखादी गोष्ट कळाली नाही तर ती कधीच पूर्णपणे कळणार नाही." त्यांनी नेहमीच रटाळवाण्या शिक्षणपद्धतीचा धिक्कार केला.स्पष्ट विचार व स्पष्ट मांडणी हा त्यांच्या अध्यापनाचा गाभा होता.
प्रकाशित ग्रंथ
- आर. पी. फाइनमन, जे. हिब्स, पाथ इंटिग्रल्स अँड क्वांटम फील्ड थियरी
- आर. पी. फाइनमन, आर. लेटन, शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन! (आत्मचरित्र)
- आर. पी. फाइनमन, द मीनिंग ऑफ इट ऑल
- द कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ (तत्त्वज्ञान)
- आर. पी. फाइनमन, आर. लेटन, व्हॉट डू यू केर व्हॉट अदर पीपल थिंक? (आत्मचरित्र)
- आर. पी. फाइनमन, आर. लेटन, एम. सॅंड्स्, द फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स