रा.मु. पगार
रा.मु.पगार | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संपादन,रेखाचित्रण,काव्य |
साहित्य प्रकार | कविता |
वडील | मुकुंदराव पगार |
पत्नी | शोभा |
रा.मु. पगार (जन्म दिनांक?) - हयात) हे मराठी कवी,सहसंपादक आणि रेखाचित्रकार आहेत.
कारकीर्द
काव्याग्रह या नियतकालिकाचे सहसंपादक.
कवितासंग्रह
अस्तित्वाच्या पाऊलखुणा
"अस्तित्वाच्या पाऊलखुणा" हा कविता संग्रह २९ ऑगस्ट २०१०ला वाशिम येथे प्रकाशित झाला. [१] अस्तित्वाच्या पाऊल खुणा हा काव्यसंग्रह कवी पगार यांची दुसरी साहित्यकृती आहे. पगार यांची रेखाचित्रकार म्हणून ओळख आहेच; पण पगार हे सिद्धहस्त कवी आहेत याची पावती या संग्रहामुळे मिळाली. या संग्रहाला मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
मृणालिनी कानिटकर-जोशी यांच्या म्हणण्यानुसार रा.मु.पगार यांची कविता मुख्यत्वे ग्रामीण जीवनाचा आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष मांडू पहाते.आपल्या कुंचल्यातुन आणि शब्दातून कवीने आपल्या आणि पर्यायानं परिस्थितीनं हतबल अशा साऱ्याच माणसांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न कवीनं केला आहे.[२]
पुरस्कार
- कविवर्य केसवसुत पुरस्कार (देवयाणी प्रकाशन) सन २०१० [ संदर्भ हवा ]
- कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार (संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर) सन २०११ [ संदर्भ हवा ]
- देवअप्पा पसारकर साहित्य पुरस्कार (केकतउमरा, जि. वाशीम) सन २०१० [ संदर्भ हवा ]
- कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार (अंकुर साहित्य संघ) [ संदर्भ हवा ]
रेखाचित्रे
‘अनुष्टुभ’, ‘हंस’, ‘युगवाणी’, ‘साहित्य अमृत’ साहित्य अकादमीचं ‘समकालीन भारतीय साहित्य’ या नियतकालिकांनी वेळोवेळी रेखाचित्र प्रकाशित केली. [३]
संदर्भ
- ^ आगामी : मुळांचा शोध घेताना..- ले. रा.मु. पगार - रविवार, २९ ऑगस्ट २०१० हा लेख[permanent dead link] दैनिक लोकसत्तात संकेतस्थळावर दिनांक १५ मे रात्रौ. १२.०४ मिनीटांनी जसा दिसला . लेखकाने स्वतःच्या काव्य संग्रहाबद्दलचा लेख पुरेशा तटस्थतेने संदर्भनीय स्रोत वृत्तपत्रात लिहिला असल्यामुळे, संदर्भग्राह्य धरला [मृत दुवा]
- ^ [ http://www.miloonsaryajani.com/node/581 Archived 2016-03-05 at the Wayback Machine. आपल्या वाचनालयात ले.मृणालिनी कानिटकर-जोशी] मिळून साऱ्या जणी संकेतस्थळ दिनांक १५ मे रात्रौ. १२.०४ मिनीटांनी जसा दिसले
- ^ आगामी : मुळांचा शोध घेताना..- ले. रा.मु. पगार - रविवार, २९ ऑगस्ट २०१० हा लेख[permanent dead link] दैनिक लोकसत्तात संकेतस्थळावर दिनांक १५ मे रात्रौ. १२.०४ मिनीटांनी जसा दिसला . लेखकाने स्वतःच्या काव्य संग्रहाबद्दलचा लेख पुरेशा तटस्थतेने संदर्भनीय स्रोत वृत्तपत्रात लिहिला असल्यामुळे, संदर्भग्राह्य धरला [मृत दुवा]