राहुल शर्मा (क्रिकेट खेळाडू)
व्यक्तिगत माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | राहुल शर्मा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
जन्म | ३० नोव्हेंबर, १९८६ जालंधर, पंजाब, भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
उंची | ६ फूट ४ इंच (१.९३ मी) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गोलंदाजीची पद्धत | लेगब्रेक गुगली | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
भूमिका | गोलंदाजी | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
राष्ट्रीय बाजू | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
एकदिवसीय पदार्पण (कॅप १९३) | ८ डिसेंबर २०११ वि वेस्ट इंडिज | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शेवटचा एकदिवसीय | २८ जुलै २०१२ वि श्रीलंका | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
टी२०आ पदार्पण (कॅप ४१) | ३ फेब्रुवारी २०१२ वि ऑस्ट्रेलिया | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शेवटची टी२०आ | ३ फेब्रुवारी २०१२ वि ऑस्ट्रेलिया | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देशांतर्गत संघ माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वर्षे | संघ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
२००६–सद्य | पंजाब | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
२०१० | डेक्कन चार्जर्स | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
२०११-२०१३ | पुणे वॉरियर्स इंडिया | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
२०१४ | दिल्ली डेअरडेव्हिल्स | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
२०१५ | चेन्नई सुपर किंग्स | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
कारकिर्दीतील आकडेवारी | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २ ऑगस्ट २०२४ |
राहुल शर्मा (जन्म ३० नोव्हेंबर १९९६) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो प्रामुख्याने उजव्या हाताने लेगब्रेक आणि गुगली गोलंदाजी करतो. तो २००६ पासून पंजाब क्रिकेट संघाचा सदस्य आहे. आयपीएल २०११ मध्ये पुणे वॉरियर्ससाठी केलेल्या त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
कारकिर्दीची सुरुवात
राहुलने मध्यमगती गोलंदाज म्हणून सुरुवात केली पण त्याच्या प्रशिक्षकाने त्याला सुचविल्यानंतर लवकरच तो लेगस्पिनकडे वळला.[१] त्याने २५ डिसेंबर २००६ रोजी पंजाबकडून राजस्थानविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु पुन्हा खेळण्यासाठी त्याला २००९ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. रणजी करंडकाच्या २००९-१० हंगामात, त्याने सात प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १२ बळी घेतले. २०१०-११ हंगामात राहुल फक्त एकच रणजी सामना खेळला होता.
इंडियन प्रीमियर लीग
२०१० मध्ये राहुल शर्माने डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. डेक्कन चार्जर्सकडून खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये त्याने फक्त पाच विकेट्स घेतल्या आणि प्रति षटक ८.०८ धावा दिल्या. २०११ च्या आयपीएलमध्ये, राहुल शर्माने पुणे वॉरियर्ससाठी चांगली गोलंदाजी करून नाव कमावले. २०११ च्या इंडियन प्रीमियर लीग मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याचे ४-०-७-२ आकडे हे सरोत्तम गोलंदाजी पृथ्थकरण होते आणि या कामगिरीने भारतात ट्विटरवर त्याच्या नावाचा ट्रेंड पाहण्यासाठी पुरेशी चर्चा निर्माण केली. २०१३ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पुणे वॉरियर्स इंडिया यांच्यातील आयपीएल सामन्यात क्रिस गेलने एकाच षटकात ५ सलग षटकार मारल्याने शर्माची प्रतिष्ठा एकाच सामन्यात धुळीस मिळाली. नंतर २०१५ मध्ये राहुल शर्माला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ८ लिलावात विकत घेतले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
८ डिसेंबर २०११ रोजी, राहुलने वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तीन गडी बाद केले. तिन्ही फलंदाज त्रिफळाचीत झाले. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यात राहुलने त्याची पहिली धाव आणि एकमेव धाव केली. झेवियर डोहर्टीच्या गोलंदाजीवर त्याने १ चेंडूत १ धाव काढली.
१ फेब्रुवारी २०१२ रोजी, राहुलने स्टेडियम ऑस्ट्रेलिया/सिडनी ऑलिम्पिक पार्क येथे सध्या एएनझेड स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील १ल्या टी२० मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. त्याचे पहिले षटक टाकताना त्याच्या बोटाला दुखापत झाली पण नंतर गोलंदाजी सुरू ठेवण्यासाठी तो परत आला. त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० बळी डेव्हिड हसीचा होता जो त्रिफळाचीत झाला होता.
संदर्भयादी
- ^ "वॉरियर्स लोन बेकन". हिंदुस्थान टाइम्स. ६ मे २०११. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.