Jump to content

राहुल कोसंबी

राहुल कोसंबी हे एक मराठी लेखक आहेत.

ते एम.ए. झाले असून दलित नवमध्यमवर्ग या विषयात संशोधन करीत करीत आहेत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या गावचे आहेत. ते नॅशनल बुक ट्रस्टसाठी मराठी आणि कोकण विभागाचे काम मुंबईतून करतात.

त्यांनी दहा ते बारा वर्षे सामाजिक विषयांवर राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक अंगाने लेखन केले. त्यांनी विद्यार्थी असताना लोकवाङ्मय गृहामध्ये ग्रंथनिर्मिती, संपादन केले. ते मुक्त शब्दचे संपादकीय सल्लागार आहेत. या अनुभवांचा फायदा त्यांना लेखनातही झाला.

कोसंबी यांना उभं आडवं या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१७ युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात कोसंबी यांचे साहित्य, संस्कृती, दलित अत्याचार अशा विविध विषयांवरील निबंध एकत्रित केले आहेत.