राहु
?राहु महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दौंड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
लोकसंख्या | १६,६५७ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | देशमुख सर |
मराठी | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/42 |
राहु हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
गाव हे मुळा मुठा नदीजवळ वसले असून भीमा नदीचा ही संगम या गावाजवळ होतो.. बारामाही पाणी आणि शेती उपयोगी जमीन इथे पाहायला मिळते..
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
सर्व जाती धर्माची लोक इथे राहतात.. गुढीपाडव्याला गावची यात्रा असते .. सोंग,कुस्ती अश्याप्रकरचे कार्यक्रम या ठिकाणी होतात.तसेच सार्वजनिक शिवजयंती साजरी होते, शंभुराजे युवा प्रतिष्ठान दरवर्षी गणेशोत्सव साजरा होतो. त्यात अनेक लोक कार्यक्रम, शिबिरे ,प्रभोदन, कीर्तने,जादूगार असे विविध कार्यक्रम होतात. लोकजीवन शेतीवर अवलंबून आहे..तसेच 1 गाव आणि 17 वाड्या अश्याप्रकारची रचना आहे.
प्रेक्षणीय स्थळे
मुळा मुठा नदी आणि जवळचा संगम,महादेव मंदिर,हनुमान मंदिर,हनुमान मंदिर,दत्त मंदिर पांडुरंग मंदिर
नागरी सुविधा
एस्टी, पीयमटी,चांगले रस्ते अंतर्गत गटार लाईन,शाळा महाविद्यालय,उच्च शिक्षण,पिण्याचे पाणी,पथ दिवे ,सर्व नागरी सुविधा आहेत
जवळपासची गावे
पिंपळगाव, वाळकी,देवकरवाडी, टेळेवाडी,पिलानवाडी