राही अनिल बर्वे
चित्रपट दिग्दर्शक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | राही बर्वे | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
मातृभाषा | |||
उल्लेखनीय कार्य | |||
| |||
राही अनिल बर्वे (जन्म: ४ जून १९७९) उपाख्य राही बर्वे एक भारतीय लेखक, दिग्दर्शक, व पटकथालेखक व विशेष दृश्यपरिणाम (व्हीएफएक्स) कलाकार आहेत [१] राहीच्या उल्लेखनीय कामांमध्ये मांझा हा लघुपट[२] , व तुंबाड हा चित्रपट आहे.[३]
दिग्दर्शन
२००८ साली राहीने 'मांझा' या पहिल्या लघुपटावर काम सुरू केले. झोपडपट्टीतला एक मुलगा, त्याची अज्ञान बहीण व एक विकृत पोलीस शिपाई यांच्यात गुंफलेली ही सूडकथा आहे.[४][५]
त्यानंतर २००९ साली, राहीने 'तुंबाड' या मुख्यप्रवाहातील त्यांच्या पहिल्या भयपटाची निर्मिती सुरू केली. २०१५ पर्यंत चित्रीकरण संपूनही तुंबाड एकूण नऊ वर्षं बासनात अडकून बसला होता. जुलै २०१८ मध्ये तुंबाडची पहिली झलक प्रसृत करून ऑक्टोबर २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.[६]
वैयक्तिक आयुष्य
राही हे मराठी लेखक व कथाकार अनिल बर्वे व बँक अधिकारी प्रेरणा बर्वे या दांपत्याचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. राहींचे वडील अनिल बर्वे हे हमिदाबाईची कोठी या नाटकाचे लेखक होत.[७] राहीचे आजोबा शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी होते. राहीच्या मावशी[८] व लेखिका मल्लिका अमर शेख यांचा विवाह कवी व दलित कार्यकर्ते नामदेव ढसाळ, यांच्याशी झाला होता.[९] मराठी सिनेसृष्टीतील नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, राहीच्या ज्येष्ठ भगिनी आहेत.[१०]
संदर्भ
- ^ "Touching Indifference". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-10-18 रोजी पाहिले.
- ^ "Indian Short Film Manjha in Slumdog Blue-ray Disc". IMDb. 2018-10-18 रोजी पाहिले.
- ^ "Sohum Shah's Tumbbad gets a release date, Here's all you need to know". dna (इंग्रजी भाषेत). 2018-07-04. 2018-10-18 रोजी पाहिले.
- ^ Raphael, Amy (2013-04-02). Danny Boyle: Authorised Edition (इंग्रजी भाषेत). Faber & Faber. ISBN 9780571301874.
- ^ O'Neill, Phelim. "DVD review: Slumdog Millionaire". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-10-18 रोजी पाहिले.
- ^ "Rajkumar Hirani on Sohum Shah's Tumbad : Haven't seen a more visually stunning film in a long time". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-22. 2018-10-18 रोजी पाहिले.
- ^ Natarajan, Nalini; Nelson, Emmanuel Sampath (1996). Handbook of Twentieth-century Literatures of India (इंग्रजी भाषेत). Greenwood Publishing Group. ISBN 9780313287787.
- ^ "Review: I Want to Destroy Myself: A Memoir by Malika Amar Shaikh". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2018-02-02. 2018-10-18 रोजी पाहिले. External link in
|work=
(सहाय्य) - ^ "Love's Backyard, A Scorched Soul". https://www.outlookindia.com/. 2018-10-18 रोजी पाहिले. External link in
|work=
(सहाय्य) - ^ "काय 'ब्र' लिहावं?". Loksatta. 2018-01-26. 2018-10-18 रोजी पाहिले.