Jump to content

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ही भारतातील शिक्षक प्रशिक्षण संस्थांना मान्यता देणे, काढून घेणे, शिक्षक प्रशिक्षणासाठी निश्चित प्रमाणके घालून देणे, अध्ययन साहित्याची निर्मिती करणे, शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम व पद्धत यांच्या विकसासंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली अग्रगण्य संस्था आहे. हिची स्थापना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद कायदा, १९९३तहत झालेली आहे.