राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद
चित्र:NAAC LOGO.png नॅक बोधचिन्ह | |
संस्थेचे अवलोकन | |
---|---|
निर्माण | १९९४ |
अधिकारक्षेत्र | भारत |
मुख्यालय | बंगलोर, कर्नाटक, भारत |
ब्रिद | Excellence . Credibility . Relevance |
संस्थेचे कार्यकारी अधिकारी |
|
मूळ खाते | शिक्षण मंत्रालय, भारत सरकार |
मूळ अभिकरण | विद्यापीठ अनुदान आयोग |
संकेतस्थळ | www |
खाते |
राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( इंग्रजी: National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) ही अशी संस्था आहे जी उच्च शिक्षण , इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. याची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली.
पार्श्वभूमी
मूल्यांकन आणि मान्यता याद्वारे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा 'दर्जा' आणि 'शैक्षणिक गुणवत्ता' ओळखला जातो. हे मूल्यांकन कोणत्याही शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ प्रमाणन एजन्सीद्वारे निश्चित केलेल्या गुणवत्तेची पातळी निश्चित करते. शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था, प्रशासन, आर्थिक स्थिती आणि विद्यार्थी सेवा इत्यादीची नोंद घेतली जाते.
मूल्यांकन
पुढील आठ श्रेणींद्वारे नॅक विविध शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करते[२]
संस्थात्मक CGPA श्रेणी | अक्षरात्मक श्रेणी | कामगिरी निष्कर्ष |
---|---|---|
३.५१ – ४.०० | अ++ | मान्यताप्राप्त |
३.२६ – ३.५० | अ+ | मान्यताप्राप्त |
३.०१ – ३.२५ | अ | मान्यताप्राप्त |
२.७६ – ३.०० | ब++ | मान्यताप्राप्त |
२.५१ – २.७५ | ब+ | मान्यताप्राप्त |
२.०१ – २.५० | ब | मान्यताप्राप्त |
१.५१ – २.०० | क | मान्यताप्राप्त |
≤ १.५० | ड | अमान्य |
संदर्भ
- ^ "Director NAAC". NAAC. 10 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Assessment Outcome". www.naac.gov.in.