Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ८

राष्ट्रीय महामार्ग ८
Map
राष्ट्रीय महामार्ग ८ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी ३७१ किलोमीटर (२३१ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवातकरीमगंज, करीमगंज जिल्हा, आसाम
शेवट साब्रूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा
स्थान
राज्येत्रिपुरा, आसाम

राष्ट्रीय महामार्ग ८ (National Highway 8) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे. हा महामार्ग त्रिपुरा राज्याला आसामसोबत जोडतो. आसामच्या करीमगंज शहराजवळून ह्या महामार्गाची सुरुवात होते व दक्षिणेकडे ३७१ किमी धावून हा महामार्ग भारत-बांगलादेश सीमेवरील साब्रूम ह्या गावाजवळ संपतो. त्रिपुराची राजधानी आगरताळा तसेच धर्मनगर, अम्बासा, उदयपूर ही प्रमुख शहरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत.