Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ३

राष्ट्रीय महामार्ग ३
Map
राष्ट्रीय महामार्ग ३ चे नकाशावरील स्थान
लेह-मनाली महामार्गावरील कुलू
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी ५५६ किलोमीटर (३४५ मैल)
देखरेखभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवातअटारी, पंजाब
शेवटलेह, लडाख
स्थान
शहरेश्रीनगर, बारामुल्ला, द्रास, कारगिल, लेह
राज्येपंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख

राष्ट्रीय महामार्ग ३ (National Highway 1) हा भारताच्या पंजाब, हिमाचल प्रदेशलडाख ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील अटारी ह्या गावामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ५५६ किमी धावून लडाखची राजधानी लेह येथे संपतो. अमृतसर, कर्तारपूर, जालंधर, होशियारपूर, हमीरपूर, मंडी, कुलू, मनाली ही नगरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

इतिहास

२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलल्यानंतर खालील तीन महामार्गांचे भाग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग ३ची निर्मिती करण्यात आली.

मार्ग

राष्ट्रीय महामार्ग ३चा मोठा हिस्सा हिमालय पर्वतरांगांमधून वाट काढत जातो. ह्या मार्गावरील मनाली ते लेह दरम्यान जगातील सर्वात उंचीवर असलेले काही घाट अस्तित्वात आहेत. ह्यांपैकी बरेचसे घाट हिवाळ्यामध्ये हिमवृष्टीमुळे बंद राहतात. सुमारे १३,००० फूट उंचीवर असलेला रोहतांग घाट कुलू जिल्ह्याला लाहौल आणि स्पिति जिल्ह्यासोबत जोडतो. रोहतांग घाटावरील ताण कमी करण्यासाठी २०१० साली अटल बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तसेच सुमारे १६,००० फूट उंचीवर असलेला लुंगालाचा घाट व १७,४८० फूट उंचावरील टगलांग ला हे दुर्गम घाट राष्ट्रीय महामार्ग ३ वर आहेत.

जुळणारे प्रमुख महामार्ग