राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ही भारतात राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. फक्त भारतीय राष्ट्रीयत्व असलेल्या आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही खुली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(एन.सी.इ.आर.टी.) या अधिकृत संस्थेतर्फे घेतली जात असल्याने शालेय पातळीवरील प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते.[१], [२] केवळ इयत्ता दहावीत शिकणारे शालेय विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र असतात.
इतिहास
१९६१ मध्ये एन.सी.इ.आर.टी.ची स्थापना झाल्यावर लगेचच १९६३ मध्ये हुशार विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा सुरू करण्यात आली. हुशार विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शिष्यवृत्ती देणे हा या योजनेचा उद्देश्य होता. पहिल्या वर्षात फक्त दिल्ली केंद्रशासित प्रदेशात आकरावीच्या १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
परीक्षापद्धतीत बदल
१९६४ मध्ये परीक्षा सर्व राज्यांत व केंद्रशासित प्रदेशात घेण्यात आली व ३५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्ती लेखी परीक्षा, एक प्रकल्प अहवाल आणि मुलाखत यांच्या आधारावर देण्यात आल्या. लेखी परीक्षेत विज्ञानावरील प्रश्न आणि विज्ञानावरील निबंध होते. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेवेळी प्रकल्प अहवाल द्यावा लागे. यातून मुलाखतीसाठी काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात येई आणि त्यानंतर या चारही गोष्टींच्या निकालावरून विज्ञानातील उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत.
१९७६ मध्ये नवीन १०+२+३ शिक्षण पद्धतीनुसार या परीक्षेत बदल करण्यात आले. फक्त विज्ञानाच्या उच्च शिक्षणाशिवाय समाजशास्त्र, आभियांत्रिकी व वैद्यकशास्त्र यांच्या उच्च शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात झाली.
संदर्भ व नोंदी
- ^ "दैनिक लोकसत्ता दुवा ता ९ ऑगस्ट २००६ जसा १५ जून २००९ रोजी सायं ८ वाजता आढळला". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-15 रोजी पाहिले.
- ^ दैनिक लोकसत्ता दुवा ता २३ नोव्हे.२००५ जसा १५ जून २००९ रोजी सायं ८ वाजता आढळला Archived 2016-03-11 at the Wayback Machine.,