Jump to content

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

শ্রেষ্ঠ মারাঠি ভাষার চলচ্চিত্র বিভাগে জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (bn); National Film Award/Bester Film in Marathi (de); National Film Award for Best Feature Film in Marathi (en); ナショナル・フィルム・アワード 最優秀マラーティー語長編映画賞 (ja); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (mr) ナショナル・フィルム・アワード マラーティー語長編映画賞 (ja)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
ह्याचा भागराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
प्रायोजक
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[] हा पुरस्कार मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[]

भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या १७ भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले.

प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित, १९५४ साली महाराष्ट्राच्या समाजसुधारक जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित महात्मा फुले या चित्रपटाला मराठीतील प्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक प्रदान करण्यात आले. जब्बार पटेल दिग्दर्शित पाच चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे: सामना (१९७५), जैत रे जैत (१९७७), सिंहासन (१९७९), उंबरठा (१९८२) आणि एक होता विदूषक (१९९२). राजा ठाकूर दिग्दर्शित चार चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे: मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), रंगल्या रात्री अश्या (१९६२), एकटी (१९६८) आणि मुंबईचा जावई (१९७०). दिग्दर्शक अनंत माने, माधव शिंदे आणि संजय सूरकर यांना प्रत्येकी तीन चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

नलिनी प्रोडक्शन्स निर्मित भोंगा या चित्रपटासाठी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना अलीकडील २०१८ मध्ये ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला आहे.[]

विजेते

टिप्पणी
*
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक
*
दुसऱ्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र
*
तिसऱ्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र
*
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र
वर्षचित्रपटनिर्मातेदिग्दर्शकसंदर्भ
१९५४महात्मा फुलेअत्रे पिक्चर्सप्रल्हाद केशव अत्रे[][]
१९५५मी तुळस तुझ्या अंगणीनव चित्रराजा ठाकूर[]
शेवग्याच्या शेंगासदाशिव कवीशांताराम आठवले
१९५६पुरस्कार नाही []
१९५७गृहदेवतासुरेल चित्रामाधव शिंदे[]
१९५८धाक्टी जाऊसर्वश्री वामनराव कुलकर्णी, विष्णुपंत चव्हाणअनंत माने[]
१९५९पुरस्कार नाही[१०]
१९६०कन्यादानसुरेल चित्रामाधव शिंदे[११]
उमज पडेल तारनारायण बाबुराव कामतदिनकर डी. पाटील
१९६१मानिनीकला चित्राअनंत माने[१२]
वैजयंतारेखा फिल्म्सगजानन जहागीरदार
मानसला पंख अस्ततमाधव शिंदेमाधव शिंदे
१९६२रंगल्या रात्रि आश्यामहाराष्ट्र फिल्म इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडराजा ठाकूर[१३]
जावई माझा भलामनीषा चित्र प्रायव्हेट लिमिटेडनीलकंठ मगदूम
गरीबा घरची लेकशिवाजी गुलाबराव काटकरकमलाकर विष्णू तोरणे
१९६३हा माझा मार्ग एकलासुधीर फडकेराजा परांजपे[१४]
ते माझे घररवींद्र भटगणेश भट
१९६४पाठलागराजा परांजपेराजा परांजपे[१५]
तुका झालासी कळसएन जी दातारराजा नेने
सवाल माझा ऐका!अनंत मानेअनंत माने
१९६५साधी मानसालीलाबाई भालजी पेंढारकरभालजी पेंढारकर[१६]
निर्मोन (कोंकणी)फ्रँक फर्नांडए. सलाम
युगे युगे मी वाट पाहिलीबाबासाहेब एस फतेहलालसी. विश्वनाथ
१९६६पावना काठचा धोंडीमहालक्ष्मी चित्राअनंत ठाकूर
१९६७संथ वहाटे कृष्णामाईसहकारी चित्रपथ संस्था लिमिटेडएम. जी. पाठक[१७]
१९६८एकटीजी. चौगलेराजा ठाकूर[१८]
१९६९तांबडी मातीलीलाबाई भालजी पेंढारकरभालजी पेंढारकर[१९]
१९७०मुंबईचा जावईतुषार प्रधानराजा ठाकूर[२०]
१९७१शांतता! कोर्ट चालू आहेसत्यदेव गोविंद प्रॉडक्शनअरविंद देशपांडे
१९७२पिंजराव्ही. शांतारामव्ही. शांताराम[२१]
१९७३पुरस्कार नाही[२२]
१९७४पुरस्कार नाही[२३]
१९७५सामनारामदास फुटाणेजब्बार पटेल[२४]
१९७६पुरस्कार नाही
१९७७जैत रे जैतउषा मंगेशकरजब्बार पटेल[२५]
१९७८पुरस्कार नाही[२६]
१९७९सिंहासनजब्बार पटेलजब्बार पटेल[२७]
१९८०पुरस्कार नाही [२८]
१९८१उंबरठाजब्बार पटेल, डी. व्ही. रावजब्बार पटेल[२९]
१९८२शापितमधुकर रुपजी, सुधा चितळे, विनय नेवाळकरअरविंद देशपांडे, राजदत्त[३०]
१९८३स्मृती चित्रेविनायक चासकरविजया मेहता[३१]
१९८४महानंदा महेश सातोस्करके जी कोरेगावकर[३२]
१९८५पुढचे पाऊलमधुकर रुपजी, सुधा ए. चितळे, विनय नेवाळकरराजदत्त[३३]
१९८६पुरस्कार नाही[३४]
१९८७सर्जासीमा देवराजदत्त[३५]
१९८८पुरस्कार नाही [३६]
१९८९कळत नकळतस्मिता तळवलकरकांचन नायक[३७]
१९९०पुरस्कार नाही [३८]
१९९१पुरस्कार नाही [३९]
१९९२एक होता विदुषकराष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळजब्बार पटेल[४०]
१९९३लपंडावसचिन पारेकर, संजय पारेकरश्रावणी देवधर[४१]
१९९४पुरस्कार नाही[४२]
१९९५बनगरवाडीराष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, दूरदर्शनअमोल पालेकर[४३]
१९९६राव साहेबके.बी. जोशी, रवींद्र सुर्वेसंजय सुरकर[४४]
१९९७पुरस्कार नाही[४५]
१९९८तू तिथे मीस्मिता तळवलकरसंजय सुरकर[४६]
१९९९घराबाहेररतन मदन, नरेंद्र शिंदेसंजय सुरकर[४७]
२०००अस्तित्वझामु सुखंदमहेश मांजरेकर[४८]
२००१पुरस्कार नाही[४९]
२००२वास्तुपुरुषराष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळसुमित्रा भावे, सुनील सुकथनकर[५०]
२००३नॉट ओन्ली मिसेस राऊतअदिती देशपांडेगजेंद्र अहिरे[५१]
२००४उत्तरायणबिपीन नाडकर्णी, संजय शेट्टीबिपिन नाडकर्णी[५२]
२००५डोंबिवली फास्टरमाकांत गायकवाडनिशिकांत कामत[५३]
२००६शेवरीनीना कुलकर्णीगजेंद्र अहिरे[५४]
२००७निरोपअपर्णा धर्माधिकारीसचिन कुंडलकर[५५]
२००८हरिश्चंद्राची फॅक्टरीयूटीव्ही मोशन पिक्चर्स, स्मिती कनोडिया, परेश मोकाशीपरेश मोकाशी[५६]
२००९नटरंगझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसरवींद्र हरिश्चंद्र जाधव[५७]
२०१०मला आई व्हायचय!समृद्धी पोरेसमृद्धी पोरे[५८]
२०११शाळाविवेक वाघ, निलेश नवलकरसुजय डहाके[५९]
२०१२इन्वेस्टमेंटप्रतिभा मतकरीरत्नाकर मतकरी[६०]
२०१३आजचा दिवस माझाव्हाईट स्वान प्रोडक्शन्सचंद्रकांत कुलकर्णी[६१]
२०१४किल्लाजार पिक्चर्स, एम. आर. फिल्म वर्क्सअविनाश अरुण[६२]
२०१५रिंगणमाझी भूमिका मोशन पिक्चर्समकरंद माने[६३]
२०१६दशक्रियारंगनील क्रिएशन्ससंदीप भालचंद्र पाटील[६४]
२०१७कच्चा लिंबूमंदार देवस्थळीप्रसाद ओक[६५]
२०१८भोंगानलीनी प्रॉडक्शन्सशिवाजी लोटन पाटील[६६]
२०१९बार्डोपाचजन्य प्रॉडक्शन प्रा. लिमिटेडभीमराव मुडे[६७]
२०२०गोष्ट एका पैठणीचीप्लॅनेट मराठीशंतनू गणेश रोडे[६८]
२०२१एकदा काय झालं!सलील कुलकर्णी, शोबॉक्स एंटरटेनमेंटसलील कुलकर्णी[६९]

संदर्भ

  1. ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. 25 ऑक्टोबर 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "National Awards 2015, as it happened: Winners, wishes and morel". India Today. 3 मे 2015. 23 मे 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 मे 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "जाणून घ्या 'भोंगा'च्या कलाकार, दिग्दर्शक आणि कथेबद्दल". लोकसत्ता.
  4. ^ "1st National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  5. ^ "2nd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  6. ^ "3rd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  7. ^ "4th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  8. ^ "5th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  9. ^ "6th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  10. ^ "7th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  11. ^ "8th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  12. ^ "9th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  13. ^ "10th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  14. ^ "11th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  15. ^ "12th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  16. ^ "13th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  17. ^ "15th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  18. ^ "16th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  19. ^ "17th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  20. ^ "18th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  21. ^ "20th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  22. ^ "21st National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  23. ^ "22nd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  24. ^ "23rd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  25. ^ "25th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  26. ^ "26th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  27. ^ "27th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  28. ^ "28th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  29. ^ "29th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  30. ^ "30th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  31. ^ "31st National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  32. ^ "32nd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  33. ^ "33rd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  34. ^ "34th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  35. ^ "35th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  36. ^ "36th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  37. ^ "37th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  38. ^ "38th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  39. ^ "39th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  40. ^ "40th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  41. ^ "41st National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  42. ^ "42nd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  43. ^ "43rd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  44. ^ "44th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  45. ^ "45th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  46. ^ "46th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  47. ^ "47th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  48. ^ "48th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  49. ^ "49th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  50. ^ "50th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  51. ^ "51st National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  52. ^ "52nd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  53. ^ "53rd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  54. ^ "54th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  55. ^ "55th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  56. ^ "56th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  57. ^ "57th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  58. ^ "58th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  59. ^ "59th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  60. ^ "60th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  61. ^ "61st National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  62. ^ "62nd National Film Award". Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  63. ^ "63rd National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  64. ^ "64th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  65. ^ "65th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  66. ^ "66th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  67. ^ "67th National Film Award" (PDF). Directorate of Film Festivals. 21 January 2022.
  68. ^ Keshri, Shweta (22 July 2022). "68th National Film Awards Full Winners List: Suriya, Ajay Devgn jointly win Best Actor". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-07-23 रोजी पाहिले.
  69. ^ "69th National Films Awards 2021" (PDF). NFDC.