राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पुरस्काराची श्रेणी | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार | ||
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
प्रायोजक | |||
| |||
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[१] हा पुरस्कार बंगाली भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२]
भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.
२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले.
१९५४ सालचा चित्ता बोस दिग्दर्शित छेले कार या चित्रपटाला बंगालीतील प्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक प्रदान करण्यात आले. नीरेन लाहिरी दिग्दर्शित जादू भट्टा आणि नरेश मित्रा दिग्दर्शित अन्नपूर्णा मंदिर या चित्रपटांना द्वितीय आणि तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र देण्यात आहे. दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या दहा चित्रपटांस हा पुरस्कार मिळाला आहे: पथेर पांचाली (१९५५), जलसाघर (१९५८), देवी (१९६०), समाप्ती (१९६१), नायक (१९६६), अशानी संकेत (१९७३), सोनार केल्ला (१९७४), हिरक राजार देशे (१९८०), घरे बैरे (१९८४), आणि घनशत्रु (१९८९)
श्री वेंकटेश फिल्म्स निर्मित आणि श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित एक जे छेलो राजा या चित्रपटासाठी अलीकडील २०१८ मध्ये ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला आहे.[३][४]
संदर्भ
- ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. 25 ऑक्टोबर 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
- ^ "National Awards 2015, as it happened: Winners, wishes and morel". India Today. 3 मे 2015. 23 मे 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 मे 2015 रोजी पाहिले.
- ^ "66th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "National Film Awards 2019: Full winners list". The Indian Express. 9 August 2019 रोजी पाहिले.
साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट