Jump to content

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट

শ্রেষ্ঠ চলচ্চিত্রের জন্য জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (ভারত) (bn); National Film Award du meilleur long métrage (fr); சிறந்த திரைப்படத்திற்கான தேசிய விருது (ta); Penghargaan Film Nasional untuk Film Fitur Terbaik (id); National Film Award/Bester Film (de); മികച്ച ചലച്ചിത്രത്തിനുള്ള ദേശീയ പുരസ്കാരം നേടിയ ചലച്ചിത്രങ്ങൾ (ml); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट (mr); Национальная кинопремия за лучший художественный фильм (ru); राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ फ़िल्म (hi); భారత జాతీయ చలనచిత్ర పురస్కారాలు - ఉత్తమ సినిమా (te); ナショナル・フィルム・アワード 最優秀作品賞 (ja); National Film Award for Best Feature Film (en); Ազգային կինոմրցանակ լավագույն գեղարվեստական ֆիլմի համար (hy); قومی فلم اعزاز برائے بہترین فیچر فلم (ur); Nationale Filmpris for bedste spillefilm (da) മികച്ച ചലച്ചിത്രത്തിനുള്ള ദേശീയ പുരസ്കാരം നേടിയ ചലച്ചിത്രങ്ങളുടെ പട്ടിക, National Film Award for Best Film (ml); ナショナル・フィルム・アワード 長編映画賞, ナショナル・フィルム・アワード 最優秀長編映画賞, 国家映画賞 長編映画賞 (ja)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
ह्याचा भागराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
प्रायोजक
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत ने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालय द्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. चित्रपटांसाठी सादर केलेल्या पुरस्कारांपैकी हा एक गोल्डन लोटलस (स्वर्ण कमल) पुरस्कार आहे. हा पुरस्कार देशभरात, सर्व भारतीय भाषांमध्ये वर्षभरात तयार होणाऱ्या चित्रपटांसाठी जाहीर केला जातो. २०१७ला या पुरस्कारात स्वर्ण कमल, प्रमाणपत्र आणि २,५०,००० रुपयाचे रोख पारितोषिकाचा समावेश होता. चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शक यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. २०१८ पर्यंत हा पुरस्कार वैशिष्ट्यीकृत चित्रपटासाठी सादर केलेल्या सहा स्वर्ण कमल पुरस्कारांपैकी एक आहे. पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा भारताचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समावेश होतो. केवळ कोणत्याही भारतीय भाषेमध्ये बनविलेले चित्रपट आणि मूक चित्रपट जे एकतर ३५मि.मी. वर वाइड गेज किंवा डिजिटल स्वरूपात शूट केले गेले असले पाहिके परंतु चित्रपट किंवा व्हिडिओ / डिजिटल स्वरूपात प्रदर्शित झाले आहेत आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ने प्रमाणित केले असले पाहिजे.

उद्घाटन पुरस्कार हे "ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्मसाठी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल" म्हणून प्रसिद्ध झाले आणि प्रल्हाद केशव अत्रे निर्मित आणि दिग्दर्शित श्यामची आई या मराठी चित्रपटाला देण्यात आला. हा पांडुरंग सदाशिव साने यांच्या मराठी कादंबरी, श्यामची आई, या वर आधारित आहे. २०१६ पर्यंत, सहासष्ठ चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. १९७८ मध्ये चित्रपटसृष्टीतील चेतन आनंद यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाने ऐंशी चित्रपटांची छाननी केली असली तरी या श्रेणीत कोणताही पुरस्कार देण्यात आला नव्हता. २०११ मध्ये दोन चित्रपटांनी पुरस्कार सामायिक केला; मराठी चित्रपट देऊळ आणि ब्यारी चित्रपट ब्यारी.

सत्यजित रे हे सर्वाधिक सन्मानित दिग्दर्शक आहे जिथे त्याच्या सहा चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे. आदि शंकराचार्य (१९८३), संस्कृत भाषेत बनलेला पहिला चित्रपट,[] आणि ब्यारी भाषेत बनलेला पहिला चित्रपट ब्यारी (२०११) यांनीही हा पुरस्कार जिंकला आहे.

विजेते

पुरस्कार प्राप्त चित्रपटविजेते खालील प्रमाणे आहेत.

वर्ष चित्रपट भाषा निर्माता दिग्दर्शक संदर्भ
१९५४श्यामची आईमराठीप्रल्हाद केशव अत्रेप्रल्हाद केशव अत्रे[]
१९५५मिर्झा गालिबहिंदीसोहराब मोदीसोहराब मोदी[]
१९५६पाथेर पांचालीबंगालीपश्चिम बंगाल सरकार सत्यजित रे []
१९५७काबूलीवालाबंगालीचारुचित्रा तपन सिन्हा[]
१९५८दो ऑंखे बारा हातहिंदीव्ही. शांतारामव्ही. शांताराम[]
१९५९सागर संगमेबंगालीदेबकी बोस[]
१९६०अपुर संसारबंगालीसत्यजित रे []
१९६१अनुराधाहिंदीऋषिकेश मुखर्जी []
१९६२भगिनी निवेदीताबंगालीबिजॉय बोस [१०]
१९६३दादा ठाकूरबंगालीसुधीर मुखर्जी [११]
१९६४शहर और सपनाहिंदीख्वाजा अहमद अब्बास
१९६५चारूलताबंगालीसत्यजित रे
१९६६चेम्मीनमल्याळमरामू करैत
१९६७तीसरी कसमहिंदीबासू भट्टाचार्य
१९६८हटे बझारेबंगाली/हिंदीतपन सिन्हा
१९६९गोपी गय्ने बाघा बय्नेबंगालीसत्यजित रे
१९७०भुवन शोमहिंदीमृणाल सेन
१९७१संस्कारकन्नडपट्टाभि राम रेड्डी
१९७२सीमाबद्धबंगालीसत्यजित रे
१९७३स्वयमवरम्‌मल्याळमअडूर गोपालकृष्णन
१९७४निर्माल्यम‌‍मल्याळमएम.टी. वासुदेवन नायर
१९७५कोरसहिंदी/बंगालीमृणाल सेन
१९७६चोमना दुढीकन्नडबी.वी. करंथ
१९७७मृग्याहिंदीमृणाल सेन
१९७८घटश्रद्धाकन्नडगिरीश कसरावल्ली
१९७९पुरस्कार नाही
१९८०शोधहिंदीबिपलब रॉय चौधरी
१९८१अकालेर संधानेबंगालीमृणाल सेन
१९८२डाकाबंगालीगौतम घोस
१९८३चोखबंगालीउत्पलेंदु चक्रबर्ती
१९८४आदि शंकराचार्यसंस्कृत जी. वी. आयर
१९८५दामुलहिंदीप्रकाश झा
१९८६चिदंबरममल्याळमगोविंदन अरविंदन
१९८७तबराना कथेकन्नडगिरीश कसरावल्ली
१९८८हलोधिया चोराए बओधन खाईअसमिया जाहनु बरुआ
१९८९पिरावीमल्याळमशाजी एन. करुण
१९९०बाघ बहादुरहिंदी/बंगालीबुद्धदेव दासगुप्ता
१९९१मरुपक्कमतमिळके. एस. सेथुमाधवन
१९९२आगंतुकबंगालीसत्यजित रे
१९९३भगवत गीतासंस्कृत जी. वी. आयर
१९९४चराचरबंगालीबुद्धदेव दासगुप्ता
१९९५उनीशे एप्रीलबंगालीरितुपर्णो घोष
१९९६कथापुरुशन्‌मल्याळमअदुर गोपालाकृष्णन्‌
१९९७लाल दर्जाबंगालीबुद्धदेव दासगुप्ता
१९९८ थायी साहेबाकन्नडगिरीश कसरावल्ली
१९९९ समरहिंदीश्याम बेनेगल
२००० वाणप्रस्थममल्याळमशाजी एन. करुण
२००१ शांतम्‌मल्याळमजयराज
२००२ द्वीपाकन्नडगिरीश कसरावल्ली
२००३ मोन्डो मेयेर उपख्यानबंगालीबुद्धदेव दासगुप्ता
२००४ श्वासमराठीसंदीप सावंत
२००५ पेज थ्रीहिंदी/इंग्लिश मधुर भंडारकर
२००६ कालपुरुषबंगालीबुद्धदेव दासगुप्ता
२००७ पुलिजन्मम्‌मल्याळमप्रियानंदन [१२]
२००८ अंतहीनबंगाली स्क्रीनप्ले फिल्मस अनिरुद्ध रॉय चौधरी
२००९ कुट्टी स्रांकमल्याळम रिलायन्स एन्टरटेन्मेट शाजी एन. करुण
२०१० अदामिंते माकन अबूमल्याळम सलीम अहमद व अशरफ बेदी सलीम अहमद
२०११ देऊळमराठी अभिजीत घोलप उमेश विनायक कुळकर्णी
ब्यारीब्यारी अल्ताफ हुसेन सुवीरन
२०१२ पान सिंह तोमरहिंदी यूटीव्ही सॉफ्टवेर कम्युनिकेशन्स तिग्मांशू धूलिया
२०१३ शिप ऑफ थीसियसइंग्रजी, हिंदी रीसायकलवाला फिल्म्स प्रा. लिमिटेड आनंद गांधी
२०१४ कोर्टमराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी झू एन्टरटेन्मेट प्रा. लिमिटेड चैतन्य ताम्हाणे
२०१५ बाहुबली: द बिगिनिंगतेलुगू शोभू यार्लागड्डा व अर्का मिडीया वर्कस एस.एस. राजामौली
२०१६ कासवमराठी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर व मोहन आगाशेसुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
२०१७ विलेज रॉकस्टार्सअसमीया रीमा दास रीमा दास
२०१८ हेल्लारोगुजराती सारथी प्रॉडक्शन एलएलपी अभिषेक शाह
२०१९मरक्कड: लायन ऑफ द अरेबियन सीमल्याळमआशीर्वाद सिनेमा प्रियदर्शन
सूरराय पोत्रुतमिळ
रॉकेट्री: द नंबी इफेक्टतमिळ, हिंदी, इंग्लिश

संदर्भ

  1. ^ Somaaya, Bhawana (8 December 2016). Once Upon a Time in India: A Century of Indian Cinema. Random House Publishers India Pvt. Limited. p. 232. ISBN 978-93-85990-40-3.
  2. ^ "1st National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "2nd National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "3rd National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "4th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "5th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "6th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "7th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "8th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "9th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "10th National Film Awards" (PDF). चित्रपट महोत्सव संचालनालय. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार Archived 2009-05-11 at the Wayback Machine. द हिंदू, जून ११, २००८.