Jump to content

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

শ্রেষ্ঠ অভিনেত্রীর জন্য জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (ভারত) (bn); National Film Award for Best Actress (fr); રાષ્ટ્રીય ફિલ્મ પુરસ્કાર - સર્વશ્રેષ્ઠ અભિનેત્રી પુરસ્કાર (gu); اَصٕل فِلمی اَداکار قومی یَنام (ks); Национальная кинопремия за лучшую женскую роль (ru); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (mr); National Film Award/Beste Hauptdarstellerin (de); Ազգային կինոմրցանակ (Հնդկաստան) լավագույն կանացի դերի համար (hy); National Film Award for bedste skuespillerinde (da); državna filmska nagrada za najboljšo igralko (sl); قومی فلم اعزاز برائے بہترین اداکارہ (ur); نړیوال فلم جایزه د ښه فلمي ستوري لپاره (ps); National Film Award för bästa kvinnliga huvudroll (sv); Premi National Film a la millor actriu (ca); פרס הקולנוע הלאומי לשחקנית הטובה ביותר (he); മികച്ച നടിക്കുള്ള ദേശീയ പുരസ്കാര ജേതാക്കൾ (ml); Ҷоизаи миллии филмӣ барои беҳтарин ҳунарпешазан (tg); राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (hi); భారత జాతీయ చలనచిత్ర పురస్కారాలు - ఉత్తమ నటి (te); ナショナル・フィルム・アワード 主演女優賞 (ja); National Film Award for Best Actress (en); Penghargaan Film Nasional untuk Aktris Terbaik (id); Εθνικό Βραβείο Κινηματογράφου της Ινδίας Α΄ γυναικείου ρόλου (el); தேசிய திரைப்பட விருதுகள் வாங்கிய நடிகைகளின் பட்டியல் (ta) चित्रपट पुरस्कार (mr); récompense cinématographique (fr); ફિલ્મ પુરસ્કાર (gu); Indian Film Awards (en); ভারতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (bn); फ़िल्म पुरस्कार (hi); Film award (da) Национальная кинопремия (Индия) за лучшую женскую роль (ru); ナショナル・フィルム・アワード 最優秀主演女優賞 (ja); National Film Award for Best Actor, ഭരത്, ഭരത് അവാർഡ്, മികച്ച നടനുള്ള ദേശീയ പുരസ്കാര ജേതാക്കൾ, National Film Award for Best Actress (ml)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
चित्रपट पुरस्कार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९६८
प्रायोजक
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते.[][]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

राज्य पुरस्काराने १९६८ मध्ये "सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा उर्वशी पुरस्कार" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. १९७५ मध्ये, त्यास "सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रजत कमल पुरस्कार" असे नाव देण्यात आले.[][][] जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, कन्नड, इंग्रजी, तेलगू, आसामी आणि उर्दू अशा दहा प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.

पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता बॉलिवूडमधील नर्गिस दत्त होता, ज्यांना १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले १९६७ च्या रात और दिन चित्रपटामधील अभिनयाबद्दल.[] रजत कमल पुरस्कार सर्वाधिक जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी ज्यांना पाच वेळा हा सन्मान मिळाला आहे.[] नंतरचा क्रमांक येतो शारदा ज्यांना तीन वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. २०१९ पर्यंत स्मिता पाटील, अर्चना, शोभना, तब्बू आणि कंगना राणावत या पाच अभिनेत्रींनी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. शारदा, अर्चना आणि शोबाना या तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये कामगिरीसाठी पुरस्कार मिळालेल्या तीन अभिनेत्री आहेत.

शारदा यांना मल्याळम व तेलगू चित्रपटांमधील कार्यासाठी पुरस्कारासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्चनाला तमिळ व तेलगू आणी शोभनाला मल्याळम व इंग्रजी चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले होते. २०१९ पर्यंत, दिवंगत मोनिषा उन्नी सर्वात कमी वयाच्या मानकरी ठरल्या आहेत जेव्हा त्यांना १९८६ मध्ये १६व्या वर्षांत मल्याळम चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. इंद्राणी हलदार आणि रितुपर्णा सेनगुप्ता या दोन अभिनेत्री आहेत ज्यांना एकाच चित्रपट - दहन साठी सन्मानित केले आहे. सर्वात अलिकडील प्राप्तकर्ते कीर्ती सुरेश आहेत, ज्यांना २०१८ च्या तेलगू चित्रपट महानटी मधील अभिनयासाठी ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले.

विजेते

अभिनेत्री वर्ष चित्रपट भाषा
नर्गीस दत्त१९६७रात और दिनहिंदी
शारदा१९६८तुलाभराममल्याळम
माधवी मुखर्जी१९६९दिब्रातीर काब्यबंगाली
रेहाना सुलतान १९७०दस्तकहिंदी
वहीदा रेहमान१९७१रेशमा और शेराहिंदी
शारदा१९७२स्वयंवरममल्याळम
नंदिनी भक्तवत्सला १९७३काडूकन्नड
शबाना आझमी१९७४अंकुरहिंदी
शर्मिला टागोर१९७५मौसमहिंदी
लक्ष्मी१९७६सिला नेरंगलिल सिला मनिथरगलतमिळ
स्मिता पाटील१९७७भूमिकाहिंदी
शारदा१९७८निमज्जनांतेलुगु
शोभा१९७९पासीतमिळ
स्मिता पाटील१९८०चक्रहिंदी
रेखा१९८१उमराव जानउर्दू
शबाना आझमी१९८२अर्थहिंदी
शबाना आझमी१९८३कंधारहिंदी
शबाना आझमी१९८४पारहिंदी
सुहासिनी मणिरत्नम१९८५सिंधु भैरवीतमिळ
मोनिषा उन्नी १९८६नाखक्षथंगलमल्याळम
अर्चना १९८७वीडूतमिळ
अर्चना १९८८दासीतेलुगु
श्रीलेखा मुखर्जी १९८९परशुरामर कुथारबंगाली
विजयशांती श्रीनिवास१९९०कार्तवय्मतेलुगु
मोलोया गोस्वामी १९९१फिरिंगोटीअसमी
डिंपल कापडिया१९९२रुदालीहिंदी
शोभना१९९३मनिचित्रथुमल्याळम
देबश्री राय १९९४उनीशे एप्रिलबंगाली
सीमा बिस्वास१९९५बॅंडिट क्वीनहिंदी
तब्बू१९९६माचिसहिंदी
इंद्राणी हलदार१९९७दहनबंगाली
रितुपर्णा सेनगुप्ता
शबाना आझमी१९९८गॉडमदरहिंदी
किरण खेर१९९९बारीवालीबंगाली
रवीना टंडन२०००दमनहिंदी
शोभना२००१मित्र, मई फ्रेंडइंग्रजी
तब्बूचांदनी बारहिंदी
कोंकणा सेन शर्मा२००२मी. ॲड मीर्स. अय्यरइंग्रजी
मीरा जास्मिन२००३पदम ओन्नु - ओरू विलापममल्याळम
तारा २००४हसीनाकन्नड
सारिका२००५परजानियाइंग्रजी
प्रियामणी२००६परुथिवीरनतमिळ
उमाश्री २००७गुलाबी टॉकीजकन्नड
प्रियांका चोप्रा २००८फॅशनहिंदी
अनन्या चटर्जी २००९अभोमानबंगाली
मिताली जगताप वरडकर २०१०बाबू बॅंड बाजामराठी
सारण्य पोन्वनन्न तेंमरकु परुवकात्रुतमिळ
विद्या बालन२०११द डर्टी पिक्चरहिंदी
उषा जाधव२०१२धगमराठी
गीतांजली थापा २०१३लायर्स डाईसहिंदी
कंगना राणावत२०१४क्वीनहिंदी
कंगना राणावत२०१५तन्नू वेड्स मन्नूहिंदी
सुरभि लक्ष्मी २०१६मिन्नामिनंगु - फायर फ्लायमल्याळम
श्रीदेवी२०१७मॉमहिंदी
कीर्ती सुरेश २०१८महानटीतेलुगु

संदर्भ

  1. ^ a b Sabharwal, Gopa (2007). India Since 1947: The Independent Years. India: Penguin Books. p. 116. ISBN 978-0-14-310274-8.
  2. ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. 25 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 October 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "21st National Awards For Films (1974)" (PDF). Directorate of Film Festivals. p. 17. 28 September 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 12 March 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "22nd National Film Festival (1975)" (PDF). Directorate of Film Festivals. p. 15. 28 September 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 July 2011 रोजी पाहिले.
  5. ^ Sinha, Meenakshi (18 October 2009). "New ailments to spice up BO". The Times of India. 2013-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 December 2012 रोजी पाहिले.
  6. ^ Nagarajan, Saraswathy (18 December 2004). "Coffee break with Shabana Azmi". The Hindu. 10 June 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 December 2010 रोजी पाहिले.