रावुरी भारद्वाज
डॉ. रावुरी भारद्वाज (इ.स. १९२७:हैदराबाद संस्थान - ) हे एक तेलुगू लेखक आहेत. यांच्या साहित्याचा बी.ए., एम.ए. आणि विद्यापीठीय स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश असून त्यांचे साहित्य अनेक संशोधनांचाही आधार ठरले आहे. नागार्जुन विद्यापीठाने आणि जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेटी बहाल केल्या आहेत.
भारद्वाज यांचा जन्म विश्वकर्मा कुटुंबात झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झालेले आहे. त्यांनी लहानपणापासून कारखान्यात कामे केली. त्यांनी १७ कादंबऱ्या, ४ एकांकिका, ५ नभोवाणी नाट्ये, ५ लघुकथासंग्रह आणि मुलांसाठीच्या ६ लघुकादंबऱ्या, यांसह चरित्रे, निबंधे आणि नाटके लिहिली आहेत. त्यांनी जमीन रयतु आणि ज्योती या नियतकालिकांत तसेच आकाशवाणीवर काम केलेले आहे.
प्रसिद्ध साहित्यकृती
- ईनुवू तेरा वेनुकू
- कौमुदी
- जीवन समरम्
- पाकुदुराल्लू
पुरस्कार
- तेलुगू अकादमी पुरस्कार
- नागार्जुन विद्यापीठाची आणि जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाची डी.लिट्. या मानद पदव्या.
- भारत सरकारचा इ.स.२०१२ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार
- बालसाहित्य परिषद पुरस्कार
- राजा लक्ष्मी सन्मान
- लोकनायक फाउंडेशनचा पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार
- सोव्हिएत लॅंड नेहरू ॲवॉर्ड