Jump to content

राल्फ माचियो

२०१५मध्ये माचियो

राल्फ जॉर्ज माचियो जुनियर (४ नोव्हेंबर, १९६१:हंटिंग्टन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा अमेरिकन अभिनेता आहे. याने द कराटे किड चित्रपट श्रृंखलेत तसेच त्या चित्रपटांपासून ३६ वर्षांनंतरचे कथानक असलेल्या कोब्रा काई या दूरचित्रवाणी मालिकेत डॅनियेल लारुसोची भूमिका केली आहे. याशिवाय माय कझिन व्हिनी चित्रपटामध्ये बिल गँबिनी, द आउटसाइडर्स मध्ये जॉनी केड तसेच इतर अनेक चित्रपटांतून त्याने भूमिका केल्या आहेत.