रायपूरतांडा
?रायपूरतांडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | किनवट |
जिल्हा | नांदेड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
रायपूरतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
रायपुर तांडा है गांव किनवट पासून पुर्वेस आहे किनवट आदिलाबाद रोड़ वर जवरला फांटा वरून 15 की मी आहे
हवामान
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
रायपुर तांडा येथे बंजारा लोक वस्ती आहे हे गांव सुनाती नाईक यानी वसविले आहे मुख्य व्यवसाय शेती आहे बंजारा समाज सिद्धु संस्कृति नुसार आपले सन उत्सव करतात
प्रेक्षणीय स्थळे
पुर्वेस गावा पासून 500 मी. अंतरावर हनुमानाची 450 वर्षा पुर्वी ची मुर्ती आहे हलीच तीथे मंदिर निर्माण केले आहे सदर हनुमान हे नवसाला पावनारा हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. व रायपुर तांडा येथे संत सेवालाल महाराज मंदिर व जगदंबा देवी चे मंदिर आहे़.