राम मुखर्जी
राम मुखर्जी (जन्म : इ.स. १९३३; - २२ ऑक्टोबर २०१७) हे एक बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक होते. मुंबईतील 'फिल्मालय' सिने स्टुडियोचे ते एक संस्थापक होते. फिल्मालयचे आणखी एक संस्थापक शशधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होय. त्यांची पत्नी कृष्णा मुखर्जी या पार्श्वगायिका, व मुलगी राणी मुखर्जी ही प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री आहे. राम मुखर्जी यांचा मुलगा अभिनेता राजा मुखर्जी याने 'बिधातार खेला' या बंगाली चित्रपटात त्याची पहिली भूमिका केली होती. तो राम मुखर्जींच्या काही चित्रपटांचा साहाय्यक दिगदर्शक होता. राम मुखर्जी यांनी राणी मुखर्जीला सुरुवातीला 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात आणले आणि तिच्यासाठी 'राजा की आयेगी बारात' ह्या तिचा पहिल्या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली.
राम मुखर्जी हे समर्थ घराण्यातील अभिनेत्री काजोलचे काका होय.
राम मुखर्जी यांचे चित्रपट
- एक बार मुस्करा दो (हिंदी, दिग्दर्शन, १९७२)
- तोमार रक्ते आमार सोहाग (बंगाली, दिग्दर्शन, १९९३)
- रक्तनदीर धारा (बंगाली, दिग्दर्शन, १९९४)
- रक्तलेखा (बंगाली, दिग्दर्शन, १९९२)
- लीडर (हिंदी, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन, १९६४)
- संबंध (हिंदी, निर्मिती, दिग्दर्शन, १९६९)
- हम हिंदुस्तानी (हिंदी, दिग्दर्शन, १९६०)