Jump to content

राम नारायण अग्रवाल

राम नारायण अग्रवाल (१९४० – १५ ऑगस्ट, २०२४[] ) हे एक भारतीय एरोस्पेस अभियंता होते. ते अग्नी मालिकेतील पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या योगदानासाठी ओळखले जातात. [] त्यांना 'अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेचे जनक' मानले जाते. []

त्यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथील एका व्यापाऱ्यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अग्रवाल यांनी कार्यक्रम संचालक (AGNI) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम केले आहे. []

पुरस्कार

  • पद्मश्री (१९९०) []
  • पद्मभूषण (२०००)
  • एरो सोसायटी ऑफ इंडियाकडून डॉ. बिरेन रॉय अंतराळ विज्ञान पुरस्कार (१९९०).
  • सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार  (१९९३)
  • DRDO तंत्रज्ञान नेतृत्व पुरस्कार (१९९८)
  • चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित विज्ञान पुरस्कार (२०००)
  • जीवनगौरव पुरस्कार (२००४)

संदर्भ

  1. ^ Somasekhar, M. (2024-08-15). "India's Agni Missile man, R N Agarwal passes away". The Siasat Daily (इंग्रजी भाषेत). 2024-08-15 रोजी पाहिले.
  2. ^ "PM promises strict N-safeguards". The Tribune. Chandigarh. 18 May 2005. 2012-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "India will test-fire longest range missile: Natrajan". 17 May 2005. 2020-04-25 रोजी पाहिले.
  4. ^ Chengappa, Raj (8 August 2005). "Charioteer Of Fire". India Today. 2024-07-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.