राम नारायण
राम नारायण (हिंदी भाषा: राम नारायण) (जन्मः डिसेंबर २५, १९२७ हे भारतीय संगीतकार आहेत. बहुधा,हे पंडित या पदवीने पण ओळखल्या जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात सारंगी या बो ने वाजवल्या जाणाऱ्या वाद्याचे मैफिलीत एकलवादन करण्यात व ते सुप्रसिद्ध करण्यास यांचा मोलाचा वाटा आहे.त्याने ते जगभरात प्रसिद्ध झालेत.
नारायण यांचा जन्म उदयपूर येथे झाला व ते बाल्यकाळातच सारंगी वाजविण्यास शिकले.ते अनेक सारंगी वादक व गायकांकडुन शिकले. त्यांनी युवावस्थेत संगीत शिक्षक म्हणुन व फिरते संगीतकार म्हणुनही काम केले.ऑल इंडिया रेडियो वर गायकाचा साथीदार म्हणुनही त्यांनी काम केले. सन १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर ते दिल्लीस गेले व साथीपेक्षाही पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले.साथ-संगतच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्रस्त होवुन,ते सन १९४९ मध्ये मुंबईस भारतीय चित्रपटात काम करण्यास स्थानांतरित झाले.
त्यातील सन १९५४ मध्ये अयशस्वी झाल्यावर, त्यांनी सन १९५६ मध्ये एकलवादन सुरू केले व मग साथ-संगत करणे सोडले.
त्यांनी १९६० च्या दशकात,एकलवादनाचे ध्वनीमुद्रण सुरू केले व अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि युरोप मध्ये दौरे सुरू केलेत. नारायणांनी,भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू केले व भारताबाहेर सन २००० नंतर कार्यक्रमदेखिल करणे सुरू केले.सन २००५ मध्ये, भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्मविभूषण ने त्यांना सन्मानीत करण्यात आले.
- उदयपूर मधील राजमहाल जेथे महाराणा यांचा दरबार भरत असे
- मध्य-वयातील नारायण
- कॉवसजी जहांगीर हॉल सन २००७
- सुरजीत सिंग,नारायण यांचे शिष्य, सारंगी वाजवितांना
- सन २००९ मध्ये त्यांची मुलगी अरुणा(लाल वस्त्रात) समवेत वाद्यवादन करतांना.
बाह्य दुवे
- "marmaris escort". 2009-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-27 रोजी पाहिले.