राम कदम पुरस्कार
राम कदम कलागौरव पुरस्कार हा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जातो. इ.स. २००९ मध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार दिला गेला. या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर , प्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर आणि इनॉक डॅनियल यांना देण्यात आला आहे.
राम कदम कला गौरव पुरस्काराचे इ.स. २००६पासूनचे मानकरी
- २००६ - गीतकार जगदीश खेबुडकर
- २००७ - संगीतकार भास्कर चंदावरकर
- २००८ - संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स
- २००९ - गायिका सुलोचना कदम (सुलोचना चव्हाण)
- २०१० - गायक चंद्रशेखर गाडगीळ
- २०११ - संगीतकार अजय अतुल
- २०१२ - गायिका उषा मंगेशकर
- २०१३ - अशोक पत्की
स्वरूप
५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.