Jump to content

रामेश्वरम

रामेश्वरम
அரக்கோணம்
भारतामधील शहर

वरून खाली: रामनाथस्वामी मंदिर, पांबन पूल व समुद्रकिनारा
रामेश्वरम is located in तमिळनाडू
रामेश्वरम
रामेश्वरम
रामेश्वरमचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 9°17′17″N 79°18′47″E / 9.28806°N 79.31306°E / 9.28806; 79.31306

देशभारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा रामनाथपुरम जिल्हा
क्षेत्रफळ ५३ चौ. किमी (२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३० फूट (९.१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४४,८५६
  - घनता ८५० /चौ. किमी (२,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे.[] रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. या बेटालाच पंबन बेट म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे. हे श्रीलंका आणि तमिळनाडू यांच्यामधील मन्नारच्या आखातात येते. रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे.[] ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.[]

रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती.[] सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे.[]

रामेश्वरम रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेचे एक टर्मिनस असून चेन्नईमदुराईहून येणारे रेल्वेमार्ग येथे संपतात.[]

एकेकाळी सन १९६४ साली धनुष्कोडी हे भारतात प्रवेश करण्यासाठीचे मोठे बंदर होते. त्यावेळी एक फार मोठे चक्रीवादळ आले, आणि त्यामुळे धनुष्कोडी शहर, तेथली रेल्वे लाईन, एक स्टीम रेल्वे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे हे सर्व वाहून गेले. या चक्री वादळाला रामेश्वर वादळ असे म्हणतात. वादळाच्या वेळी समुद्राच्या लाटांची उंची साडेचार मीटर होती.

धर्म

हिंदू तीर्थक्षेत्र असल्याने, हिंदू शहराचे अभ्यागत तळ बनवतात. मासेमारी करणाऱ्या समाजातील ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत. सी.एस.आय. मिशन चर्च आणि बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील ओरियूर येथील सेंट अँटोनी चर्च ही बेटातील प्रमुख चर्च आहेत.

संदर्भ

  1. ^ a b Atmashraddhananda, Swami (2015-02-14). A Pilgrimage to Kanyakumari and Rameshwaram (इंग्रजी भाषेत). Lulu Press, Inc. ISBN 978-1-312-91793-4.
  2. ^ Sc, Subhash C. Biswas D. (2014-09-29). India the Land of Gods (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 978-1-4828-3654-7.
  3. ^ Adharanandswami, Swaminarayan Saint Sadguru Shree (2011-10-31). Shree Haricharitramrut Sagar Hindi Part 01: Swaminarayan Book (हिंदी भाषेत). Swaminarayan Temple.
  4. ^ Swamy, Subramanian (2008). Rama Setu: Symbol of National Unity (इंग्रजी भाषेत). Har-Anand Publications. ISBN 978-81-241-1418-6.
  5. ^ Mundrey, J.S. (2009-10-29). Railway Track Engineering (इंग्रजी भाषेत). Tata McGraw-Hill Education. ISBN 978-0-07-068012-8.