रामराव माधवराव देशमुख
रामराव उर्फ अण्णासाहेब माधवराव देशमुख (नोव्हेंबर २५, इ.स. १८९२ - एप्रिल २०, इ.स. १९८१)
शिक्षण :
हे अमरावतीमधील एक बॅरिस्टर होते. यांचे शिक्षण अमरावती येथील स्कूलमधून झाले, तर उच्च शिक्षण केंब्रिजमधून..
राजकीय जीवन:-
- ब्रिटिश सरकारच्या काळात आणि नंतरही रामराव देशमुख अनेक महत्त्वाच्या राजकीय पदांवर होते.
- मध्यप्रांत आणि वऱ्हाडाच्या विधानपरिषदेचे सदस्य.1920-25, 1927-30 आणि 1937-41;
- प्रांत आणि वऱ्हाड सरकारातील मंत्री, 1927-28, 1929-30 आणि1937-38
- ग्वाल्हेर राज्याचे आर्थिक सल्लागार, 1941-44
- दक्षिण आफ्रिका संघ, भारत येथे भारताचे आयुक्त,1945-47
- रेवा राज्य - मुख्य प्रधान, 1947-48
- मध्य भारतातील विधानसभा सदस्य
- राज्यसभेत सदस्य. 3-4-1952 ते 2-4-1958 आणि 3-4-1958 ते 2-4-1964;
- १९७१ साली त्यांस पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजकीय कार्यः
तत्कालीन मध्यप्रांत व वऱ्हाडातील एक प्रमुख पुढारी, राजकारणी व मराठी भाषिकांचा महाराष्ट्र हा प्रांत बनविण्यात यावा ही मागणी सर्वप्रथम करणारे नेते होते. त्याचप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थानातील एक प्रमुख राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील विदर्भातील फार मोजक्या बॅरिस्टरांपैकी (कायदेपंडित) पैकी ते एक होत. स्थापण करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९२५-२६ वेरार लॅन्ड रेव्हेन्यू कोड सी.पी अँड बेरार लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने मंजूर केले होते. त्याचा आराखडा तयार करतांना बॅ. रामराव माधवराव देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य करण्याची सचोटी पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची सन १९४७-४८ या कालखंडात रेवा राज्याचे मुख्य प्रधान म्हणून नेमणूक केली होती.