रामप्पा मंदिर
13th century Kakatiya temple in Telangana | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मंदिर (शिव) | ||
---|---|---|---|
स्थान | Palampet, मुलुगु जिल्हा, तेलंगणा, भारत | ||
द्वारे अनुरक्षित |
| ||
वारसा अभिधान |
| ||
क्षेत्र |
| ||
| |||
रामप्पा मंदिर ह्या मंदिराला काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर (Ramappa Temple) असेहा संबोधतात. हे मंदिर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वरंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे. हे एक शिव मंदिर आहे. शिवाच्या रुद्रेश्वर अवताराची इथे पुजा केली जाते. महाशिवरात्री हा मुख्य उत्सव साजरा केला जातो. हे १३ व्या शतकातील काकतीय राजवटीत बनवलेले एक शिव मंदिर आहे. २०२१ मध्ये ह्या मंदिराचा जागतिक वारसा स्थळांच्या (युनेस्को जागतिक वारसा स्थळ- UNESCO World Heritage Site) यादीत समावेश करण्यात आले.[१][२]
इतिहास
जागतिक वारसा असलेले हे मंदिर १३ व्या शतकातील आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार काकतीय घरण्यातील राजा महाराजा गणपती देव यांच्या कल्पनेतून ह्या मंदिराची उभारणी झाली आहे. त्यांचा सेनापती रुद्र देव याने १२१३ मध्ये हे मंदिर बांधण्यास घेतले, त्यासाठी त्याने कर्नाटकामधून रामप्पा ह्या कुशल कारागिरास बोलवले. चालुक्य आणि होयसळ स्थापत्य शैलीत प्रभुत्व मिळवलेल्या रामप्पा हे मंदिर इतके सुंदर घडवीले की हे मंदिर रुद्र देवाच्या नावानं न ओळखले जाता रामाप्पाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. शिलालेखानुसार मंदिर पूर्ण व्हायला चाळीस वर्षे लागली. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केली आहे त्याची भगवान रुद्रेश्वर किंवा रामलिंगेश्वर या दोन्ही नावांनी पूजा केली जाते. [३] हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे की त्याचे नाव हे मंदिरातील विराजमान देवाच्या नावाऐवजी ते मंदिर बांधणाऱ्याच्या नावावर आहे.
इटालियन प्रवासी मार्को पोलोने भारतात काकतिया साम्राज्याच्या भेटीदरम्यान त्यांने या मंदिराला भेट दिली होती, मार्को पोलो या मंदिराच्या स्थापत्य सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता आणि त्याने कथितपणे मंदिराला "मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा" असे संबोधले.[४] रामप्पा मंदिर आहेत इतके सुंदर.
वर्णन
रामाप्पा मंदिर ६ फूट (१.8 मीटर) उंच तारेच्या आकाराच्या व्यासपीठावर भव्यपणे उभे आहे. गर्भगृहासमोरील सभामंडपात असंख्य कोरीव खांब आहेत ज्यांना प्रकाश आणि अवकाश यांचा अद्भूत संयोजन करणारा प्रभाव निर्माण करण्यासाठी स्थान दिले आहे. मुख्य रचना लालसर वाळूच्या दगडात आहे, परंतु बाहेरील गोल स्तंभांमध्ये काळ्या बेसाल्टचे मोठे कंस आहेत जे लोह, मॅग्नेशियम आणि सिलिका यांनी समृद्ध आहे. ज्यांच्यावर पौराणिक प्राणी, स्त्री नृत्यमुद्रेची, सुरसुंदरींची, मदनिका व अप्सरांची अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत आणि ही काकतीय कलेची उत्कृष्ट नमुने आहेत, त्यांच्यावरील नाजूक कोरीव काम, कामुक मुद्रा आणि लांबलचक शरीरे आणि डोके यांच्यासाठी उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या मंडोवरावर महाभारत आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरासमोर असलेली नंदीची एक विशाल एकपाषाणी काळी कुळकुळीत मूर्ती आहे जवळजवळ नऊ फूट उंचीची ही नंदीची मूर्ती सुस्थितीत आहे. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लहान शिव मंदिरे आहेत.
रामाप्पा मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेवर भगवान शिवाच्या नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत ती शिल्पे पाहूनच प्रख्यात कुचिपुडी नर्तक आणि कुलगुरू श्री नटराज रामकृष्णन यांनी लोकांच्या विस्मृतीत गेलेली पेरिनी शिवतांडवम (पेरिनी नृत्य)चे पुनरुज्जीवन केले. जयापा सेनानी यांनी नृत्य रथनावलिडमध्ये लिहिलेली नृत्याची मुद्राही या शिल्पांमध्ये दिसते. गाभाऱ्या बाहेरील मंडपात कोरीव खांब आहेत त्यातल्या एका खांबावर एकाच पाषाणातून कोरलेली कृष्णलीला आहे. [५] वारंवार युद्धे, लूट आणि विध्वंस आणि नैसर्गिक आपत्तींनंतरही मंदिर अबाधित राहिले. १७ व्या शतकात मोठा भूकंप झाला ज्यामुळे काही नुकसान झाले. पाया घालण्याच्या 'सँडबॉक्स तंत्रा'मुळे ते भूकंपापासून वाचले.[६] जवळजवळ सर्व पुरातन मंदिरे ही त्यांच्या बांधणीत वापरण्यात आलेल्या जड दगडामुळे मोडकळास निघाले आहेत, परंतु ह्या मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आलेला दगड हा हलका असल्यामुळे हे मंदिर अबाधित आहे.[७]
स्थान
हे मंदिर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वारंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे.
चित्रदालन
- मंदिराच्या बाहेरून दृश्य
- समोरची बाजू
- मागची बाजू
- खांबावरील नृत्यमुद्रा
- नृत्यमुद्रा
- मंडपामधाल रेखीव खांब
- मंदिर मंडपाच्या मध्ये
- जवळचे लहान मंदिर
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता भारतातील ३९ ठिकाणं, नव्याने झाला एका मंदिराचा समावेश".
- ^ "Divine Destinations in Telangana :: Telangana Tourism". www.telanganatourism.gov.in (इंग्रजी भाषेत). 2022-02-06 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "800 वर्षे-जुने-रामप्पा-मंदिर-तेलंगणाचे-रामलिंगेश्वर-मंदिर-म्हणूनही ओळखले जाते".
- ^ GAM; SFN (2006). Dedication. Elsevier. pp. vi.
- ^ "रामप्पा मंदिर : मंदिरांच्या आकाशगंगेतला तेजस्वी तारा". eSakal - Marathi Newspaper. 2022-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Did Kakatiya rulers hold the secret to earthquake-proof buildings?". The New Indian Express. 2022-02-06 रोजी पाहिले.
- ^ "800 वर्ष जुन्या 'रामप्पा' मंदिराचे आश्चर्यकारक 'रहस्य', आजपर्यंत शास्त्रज्ञ देखील समजू शकले नाहीत | mystery of 800 years old ramappa temple also known as the ramalingeswara temple of telangana | policenama.com". पोलीसनामा (Policenama) (इंग्रजी भाषेत). 2020-05-18. 2022-02-06 रोजी पाहिले.