रामदास वाघ
रामदास वाघ हे धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात राहणारे एक अहिराणी बोलीभाषेत कविता करणारे साहित्यिक आहेत. ते गावशीव या पहिल्या अहिराणी नियतकालिकाचे संपादकही आहेत.
रामदास वाघ यांनी अहिराणी बोलीत लिहिलेल्या १२ कवितासंग्रहांचे प्रकाशन, १२ व्यक्तींकडून, १२-१२-२०१२ या दिवशी दुपारी १२ वाजून १२ मिनिटे या वेळी झाले. या उपक्रमाची नोंद ’लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' ने घेतली आहे
ते १२ कवितासंग्रह असे
- अवास्तव
- आख्यान
- एक बिघा जमीन
- खरं से खोटं सांगाऊ नही
- तुना काय बापनं जास
- माय नावना देव
- म्हातारपननी काठी
- याले जीवन आसं नाव
- वानगी
- शेतकरी एक जीवनकैदी
- सत्तामेव जयते
- सावली
पुरस्कार आणि सन्मान
- धरणगाव येथील ‘साहित्य कला मंच’ व ‘पी.आर. हायस्कूल शतक महोत्सव समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला राज्यस्तरीय ‘बालकवी काव्य पुरस्कार’ (’तुना बापानं काय जास’ या काव्यसंग्रहाला).
- खानदेश अहिराणी कला व सांस्कृतिक संस्था आणि सानेगुरुजी अहिराणी लोककला साहित्य विकास मंच यांच्या तर्फे निगडी (पुणे) येथे २३ फेब्रुवारी २०१४ला झालेल्या ४थ्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद..
मराठी काव्यसंग्रह
- रामदास वाघ लिखित "कष्टाची भाकर" नावाचा मराठी काव्यसंग्रह आहे.
इंग्रजी व्याकरण - द बेस्ट इंग्लिश ग्रामर
- रामदास वाघ यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यानांदेखील आकलन होईल अशा सरळ आणि सोप्या भाषेत इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासासाठी "द बेस्ट इंग्लिश ग्रामर" हे पुस्तक प्रकाशित केले आहे.